मुंबई : मुंबईतल्या तरुणीची दिल्लीत झालेल्या निर्घुण हत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. मुंबईतील वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकरची (Shraddha walkar murder case) तिच्या प्रियकराने हत्या केली. आफताब पुनावाला या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणी आता नवे नवे खुलासे होत असून आणखी नवी माहिती समोर आली आहे. त्याने अमेरीकन वेब सिरीजवरुन प्रेरणा घेत हा खून केल्याचं समोर आलं आहे.
[read_also content=”‘हा खून म्हणजे लव्ह जिहादचे प्रकरण तर नव्हे?’ राम कदम यांनी व्यक्त केली शंका https://www.navarashtra.com/maharashtra/ram-kadam-reaction-on-shraddha-walkar-murder-case-nrps-344892.html”]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी श्रद्धा आणि आफताबमध्ये लग्न करण्यावरून भांडण झाले होते. त्यानंतर आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर पुढचे तीन महिने तो हळूहळू मृतदेहाचे तुकडे जंगलात नेऊन टाकत राहिला. आधी त्याने तिचा मृतदेह बाथरूममध्ये टाकला नंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी इंटरनेटवर माहिती मिळवण्याठी सर्चिंग केलं. दुसऱ्या दिवशी त्याने इलेक्ट्रिक आरी आणली आणि शरीराचे अनेक तुकडे केले. श्रद्धाचे आणि तिचे रक्ताने माखलेले कपडे कचरा उचलणाऱ्या व्हॅनमध्ये टाकण्यात आले. आफताबने श्रद्धाचे अनेक अंग लपवून कपाटात, स्वयंपाकघरात आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. यानंतर त्यांनी पुरावे पुसण्यासाठी इंटरनेटवर सर्च केले. या दरम्यान, अमेरिकन वेबसिरीज डेक्स्टरही सर्च केल्याचं समोर आलं आहे. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. आणि डेक्स्टर या वेब सिरीजवरुन प्रेरणा घेत त्याने हा खून केल्याची माहिती आहे.
श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर तिचा मृतदेह कुजू नये म्हणून त्याने एक मोठा फ्रिज घेतला. ते सर्व तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले. दुर्गंध न यावा यासाठी त्याने परफ्युम, अगरबत्ती यांचा रोज वापर करायचा. नतंर हा आफताबचा दिनक्रमच झाला.