नारायण राणेंच्या अटकेवरून नितेश राणेंचे भाष्य (फोटो- सोशल मिडिया)
सिंधुदुर्ग: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना उदधा ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. नारायण राणे तेव्हा केंद्रीय मंत्री आणि खासदार होते. दरम्यान नारायण राणे यांना अटक केल्याच क्षण मी अजूनही माझ्या मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे, असे मंत्री नितेश राणे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यात जेवणाच्या ताटावरून उठवत अटक केली होती, हा क्षण माझ्या मोबाइलमध्ये मी अजूनही सेव्ह करून ठेवला आहे, असे मंत्री नितेश राणे म्हणाले. ज्या दिवशी याची परतफेड करेन त्याच दिवशी हा व्हिडिओ मोबाइलमधून डिलीट करेन, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.
नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी रत्नागिरीमधून नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित नितेश राणे हे सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.
नितेश राणे म्हणाले, “राणे साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवू अटक करण्याचा तो प्रसंग मी आजही माझ्या मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. ज्या दफीवशी याची परतफेड करेन त्याच दिवशी हा व्हिडिओ मी डिलीट करेन.” तो क्षण जवळ आलेला आहे.
नारायण राणे यांना अटकेचे प्रकरण आहे तरी काय?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर लगेच त्यांना संगमेश्वरच्या गोळवली येथून रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गोळवली येथे त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.