Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठा विजय होऊनही भाजप शहराध्यक्ष म्हणाले, ‘विजयाचा आनंदोत्सव नाही’, जाणून घ्या त्यामागचं कारण काय?

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप (Ashwnini Jagtap) यांना मिळालेला विजय हा दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांना समर्पित करीत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे (Mahaesh Landge) यांनी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 02, 2023 | 06:29 PM
मोठा विजय होऊनही भाजप शहराध्यक्ष म्हणाले, ‘विजयाचा आनंदोत्सव नाही’, जाणून घ्या त्यामागचं कारण काय?
Follow Us
Follow Us:

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप (Ashwnini Jagtap) यांना मिळालेला विजय हा दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांना समर्पित करीत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे (Mahaesh Landge) यांनी दिली.

चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. या निवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप बहुमताने निवडून आल्या आहेत. त्यावर महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडकरांनी विकासाच्या मुद्दांवर मतदान केले. दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी शहराच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्याचे स्मरण इथल्या भूमिपुत्रांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी ठेवले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत स्वत: लक्ष घातले होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर विश्वास ठेवून सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यानंतरसुद्धा अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भाजप-शिवसेना महायुतीवर विश्वास दाखवला. त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो. या निवडणुकीत रात्रं-दिवस मेहनत घेणारे महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या एकत्रित लढ्याचा हा विजय आहे. शहराच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा विजय आम्ही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पित करतो, असे म्हटले.

आनंदोत्सव नाही…

पोटनिवडणूक दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागली आहे. जगताप यांच्या निधनामुळे शहराची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील विजयाबाबत शहर भाजप पिंपरी-चिंचवडमध्ये आनंदोत्सव साजरा करणार नाही. आम्ही जगताप यांच्या स्मृतीस्थळी भेट देणार असून, त्यांना अभिवादन करणार आहोत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा होती. त्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला नाही. निवडणुका येतील आणि जातील. पण, एखाद्या व्यक्तीने आयुष्यातील ३० वर्षे शहराची सेवा केल्यानंतर त्यांच्या निधनाने आपण संवेदनशीलता दाखवत नसेल, तर भावी पिढी आपल्याकडून काय आदर्श घेईल? अशी खंतही आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

Web Title: No celebration of victory victory in chinchwad by election dedicated to late mla laxman jagtap says mahesh landge nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2023 | 06:29 PM

Topics:  

  • Balasaheb Dabhekar
  • Congress
  • Congress Politics
  • Hemant Rasane
  • Nana patole
  • political news
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
1

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
2

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
3

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
4

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.