राज्य सरकार आहे की, नाराज सरकार; नाराजीनाट्यावरून शरद पवार गटाचा खोचक टोला
मुंबई: “लोकसभा निवडणुकीनंतरही एक्झिट पोल आले होते. त्यावेळी देशातील सर्व एक्झिट पोलने मोदी सरकारने 400 चा आकडा पार केल्याचे सांगितले होते, पण ज्या दिवशी मतपेट्या उघडल्या त्या दिवशी भाजपला 250 चा आकडाही पार करता आला नाही. सर्व एक्झिट पोलचे निकाल अयशस्वी ठरले” अशा शब्दांत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडल्या. येत्या काही तासातच निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कुणाचं सरकार स्थापन होणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
निवडणुका झाल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोलही समोर येऊ लागले आहेत. आतापर्यंत ज्या ज्या सस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले त्यांच्यानुसार महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होईल, असे अंदाज बांधले जात आहेत. पण महाराष्ट्रात एक्झिट पोलच्या अगदी उलट निकाल येतील, असं तपासे यांनी म्हटलं आहे.
राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता खूपच खालावली; अनेक भागांमध्ये AQI पोहोचला 400 पार
“महाराष्ट्रात दिलेल्या आकडेवारीनुसार भाजप पूर्णपणे मागे पडला आहे. यावेळी एक्झिट पोलचे जे निकाल समोर येत आहेत, त्याचे पूर्णपणे उलटे परिणाम दिसून येतील. महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली, त्याचा परिणाम कुठेतरी दिसून येईल का? यावर महेश तपासे म्हणाले की, रोजगारासाठी याचना करणाऱ्या तरुणांनी मतदान केले आहे. असुरक्षित वाटणाऱ्या महाराष्ट्रातील माझ्या बहिणींनी मतदान केलं आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही. आपल्या कुटुंबाच्या भवितव्याच्या चिंतेत असलेल्या शेतकरी आणि ज्येष्ठांनी या सरकारच्या विरोधात मतदान केले आहे.
देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपुरात बैठक झाली. त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात आपले सरकार जात आहे हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे. दिल्लीतील पुढील पदासाठी त्यांची शिफारस घेण्यासाठी ते मोहन भागवत यांच्याकडे गेले असावेत.
Maharashtra Exit Poll: शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का?
महाराष्ट्रात बुधवारी (20 नोव्हेंबर) विधानसभा निवडणुका पार पडल्या. निवडणुकीनंतर लगेचच जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्याचे दिसून येते. भाजप कार्यकर्त्यांमध्ये याचा आनंद असतानाच इतर राजकीय पक्षांचे समर्थक मात्र एक्झिट पोलऐवजी २३ नोव्हेंबरला निकालाची वाट पाहत आहेत.