फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत हवा प्रदूषित झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीची हवा अजूनही विषारी असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी सकाळी राजधानी दिल्लीसह बहुतांश भागात दाट धुके दाटून आल्याचे पाहिला मिळाले. अनेक भागात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 400 च्या पुढे गेला असून, तो ‘खराब’ श्रेणीत येत आहे. याशिवाय, बहुतांश भागात प्रदूषणाची पातळी ‘अत्यंत खराब’ राहिल्याचेही दिसून आले.
हेदेखील वाचा : राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता बिघडली; आजपासून GRAP 4 केला जाणार लागू, ‘या’ वाहनांना बंदी
CPCB च्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक AQI लोढी रोडचा होता जो 260 होता. ज्या भागात AQI ने सकाळी 6 पर्यंत 400 चा ओलांडला आहे. त्यात आनंद विहार (408), बवाना (409), जहांगीरपुरी (424), मुंडका (401) या भागांचा समावेश आहे. नेहरू नगर (408), शादीपूर (401) आणि वजीरपूर (412). याशिवाय बहुतांश भागात AQI 340 ते 400 दरम्यान राहिला. या आठवड्याच्या अखेरीस हवेत थोडीफार सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली असून GRAP चा चौथा टप्पाही कार्यान्वित करण्यात आला आहे.
वायू प्रदूषणावर दैनंदिन नजर ठेवण्यासाठी मॉनिटरिंग सेंटर्स तयार करण्यात आली आहेत. ही केंद्रे एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) च्या रीडिंगद्वारे डेटा प्रदान करतात. यासोबतच विषारी हवेचा धोका कमी करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. लोकांना 0-500 च्या प्रमाणात सांगितले जाते की हवा किती स्वच्छ किंवा प्रदूषित आहे, ज्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
शून्य आणि 50 मधील AQI ‘चांगला’ आहे, 51-100 ‘समाधानकारक’ आहे, 101-200 ‘मध्यम’ आहे, 201-300 ‘खराब’ आहे, 301-400 ‘अत्यंत खराब’ आहे, 401-450 ‘गंभीर’ आहे ‘आणि 450 च्या वर ‘अत्यंत गंभीर’ मानले जाते. सध्या दिल्लीतील हवा या ऋतूमधील सर्वांत खराब पातळीवर पोहोचल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. एनसीआरमधील बहुतांश भाग धुक्याच्या चादरीत दिसून आला होता.
हवेच्या खराब गुणवत्तेनुसार GRAP-4 लागू
प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सोमवारपासून राजधानी GRAP-4 राबविण्यात येत आहे. रविवारी दिल्लीचा सरासरी AQI 475 वर पोहोचला आणि जवळजवळ सर्व महत्वाच्या ठिकाणी AQI पातळी 400 च्या वर राहिला. त्यानुसार, राज्यात GRAP-IV नियम लागू करण्यात आले आहेत. सम-विषम, ऑफलाइन वर्ग पूर्ण बंद करणे, कार्यालयात 50 टक्के उपस्थिती आणि इतर आपत्कालीन उपाय यासारखे निर्णय सरकारकडून घेतले जाऊ शकतात, अशीही माहिती आहे.
हेदेखील वाचा : लोकसंख्या नियंत्रण ही देशापुढची शतकातील सर्वात मोठी गरज; सर्वांगीण दृष्टीकोन आवश्यक