फोटो सौजन्य : सोशल मीडिया
राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागांमध्ये अद्यापही पाऊस बरसला नाही. त्यामुळे उपष्णतेमध्ये प्रचंड वाढ झाली असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी देखील पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. वर्ध्यात देखील पावसाने दांडी मारली आहे. पावसाने दांडी मारल्यामुळे वर्धा जिल्हातील शेतकरी त्यांची शेतीची कामे करण्यासाठी खोळंबले आहेत. वर्ध्यात शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जून महिना संपत आला तरी देखील पाऊस बसरला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कपाशीच्या धूळ पेरण्यांची कामे पूर्ण केली आहेत. मात्र अद्याप मृग नक्षत्राचा पाऊस बरसला नाही शेतकरी चिंतेत सापडला आहे. वर्धा जिल्हातील अनेक भागांत पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतीची कामे कशी पूर्ण करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे वर्ध्यात दुबार पेरणीची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक भागांत रस्ते तुंबले होते. तर नागिरकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांचे आणि गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र या पावसानंतर उष्णतेमध्ये पुन्हा वाढ झाली होती. मात्र आज मुंबई आणि ठाण्यात तुरळक पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच मुंबई आणि कोकण विभागांत उद्या मुसळधाार पावसचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पश्चिम किणारपट्टी, कोकण आणि मध्य भारतातील काही भागांमध्ये १९ जून ते २२ जून पर्यंत हवामान विभागातर्फे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील ३ दिवस वादळी वारा, वीजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.