येणाऱ्या निवडणुकांबाबत काय म्हणाले फडणवीस? (फोटो- ट्विटर)
वर्धा: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी निवडणूक आयोगाने देखील सुरु केली आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत या निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी देखील तयारी सुरु केली आहे. आज वर्धा येथे भारतीय जनता पक्षाचे विभागीय मंथन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी निवडणुकीबाबत देखील भाष्य केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने तयारी सुरु केली आहे. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केले आहे. आगामी निवडणुकांबाबत फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. राज्यात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढणार की स्वतंत्रपणे? असा सवाल उपस्थित होत आहे.
नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढण्याचा प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे महायुती म्हणून आम्ही लढू. जिथे शक्य नाहीं तिथे मैत्रीपूर्ण लढू. मैत्रीपूर्ण हा नियम नसून, महायुती म्हणून लढणे हा नियम आहे.
🕜 1.36pm | 28-7-2025📍Wardha.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Wardha https://t.co/JkGl0CaZMN
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 28, 2025
कार्यकर्त्यांना संबोधन
येत्या निवडणुकीच्या आधी नवीन वाद उकरून काढले जातील. नवा नॅरेटिव्ह आणला जाईल. आपण केलेलं काम लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून नवीन वाद निर्माण केले जातील. मात्र आपण आपले काम लोकांपर्यंत पोहोचवले आणि त्यांनी आपल्याला मतदान केले.आता येणाऱ्या निवडणुकीत देखील आपल्याला आपले काम लोकांपर्यंत घेऊन जायचे आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) यांच्यात सामंजस्य कराराच्या अनुषंगाने ‘क्रिएटर्स इकॉनॉमी’च्या विकासासाठी कुशल मनुष् बळ विकासाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. ही केवळ सहकार्याची सुरुवात असून येत्या काळात महाराष्ट्र हे देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी 92,000 कोटी रुपयांपासून 100 दिवसांत एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचलेल्या क्रिएटर्स इकॉनॉमीच्या चढल्या आलेखाचा उल्लेख करत सांगितले की, या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम मानव संसाधनाची नितांत आवश्यकता आहे. ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन या दोन्ही गोष्टी नव्या युगात अत्यंत आवश्यक आहेत. अनेकांकडे कौशल्य असूनही प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना व्यावसायिक संधी मिळत नाहीत. या करारामुळे ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन या दोन्ही गोष्टी मिळणार आहे.