तिरूमला तिरुपती देवस्थान (टिटीडी) आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने श्री श्रीनिवास कल्याणम महोत्सव डोंबिवली कल्याण शीळ रोड वरील प्रीमियर ग्राउंड आयोजित करण्यात आला आहे .याबाबत आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली . या कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे यांनी अनेक नागरिकांना वेळेअभावी पैसे अभावी तिरुपतीला जाऊन दर्शन घेता येत नाही त्यामुळे नागरिकांना तिरुपती बालाजीचे अनुभूती घेता यावे दर्शन घेता यावे यासाठी या कार्यक्रमाचे डोंबिवलीत आयोजन केल्याचे सांगितले.
पुढे बोलताना खासदार शिंदे यांनी देशात आणि विदेशात हा कार्यक्रम केला जातो, यंदा हा मान डोंबिवलीला मिळाला आहे. 25 तारखेला सकाळी साडेसात वाजल्यापासून तर रात्री साडेदहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे. त्यामध्ये विविध पूजा, शोभायात्रा, श्रीदेवी व भुदेवीचे भगवान स्वामी व्यंकटेश्वरांसोबत दिव्य लग्नाचे अनुभूती भाविकांना घेता येणार आहे. तिरुमला तिरुपती मध्ये ज्या मूर्त्याचे पूजन होतं त्याच मुर्त्या डोंबिवलीत आणण्यात येणार आहेत, तसेच मिरवणुकीसाठी रथ देखील तिरुमला वरून येणार आहे, पुजारी देखील तिरुपतीहुन येणार आहे. सकाळी साडेसहा वाजल्यापासून विविध विधी व पूजा अर्चना दुपारी तीन वाजता मिरवणूक शोभायात्रा त्यानंतर सायंकाळी सहा ते नऊ वेळेत देवाच्या लग्नाचा भव्य दिव्य सोहळा आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी, सेवा घेण्यासाठी नावे नोंदवन्यासाठी, सेवेचा लाभ घेता यावं यासाठी 7878567567 हा नंबर देण्यात आला आहे. या नंबर वर मिस कॉल देऊन कार्यक्रमाचे नोंदणी करू शकता असा आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत केलं