सिंधुदुर्ग : २१ ओरोस विठ्ठल रखुमाई मंदीरामध्ये गेली अनेक वर्षे पुजन आरती हरीपाठ नामकरणासह नवरात्र उत्सवामध्ये भजन, दाडीया नवदुर्गेचा जागर विविध कार्यकम साजरे होतात. या मंदिरामधील स्वयंभूदेवीचे मूर्ती पाषाण भक्त भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे. नवरात्रीतील प्रत्येक दिवस देवीचा म्हणून हिरव्यासाडी वेगवेगळ्या साड्याचा मान दिला जातो. सर्वांनी मग त्यादिवशी त्या रंगाची साडी नेसायची ठरवले. हिरवा रंग सौभाग्याचा, हिरवा रंग समृद्धीचा, हिरवा रंग निसर्गाचा हिरव्यारंगाने सजलेल्या या वसुंधरेला शतशः नमन आहे .
नुतन सहकारी सोसायटी ओरोस मधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर तिथे नित्य नियमांनी सायंकाळी सर्व महीला एकत्र येऊन पुजा, आर्चा आणि आरती करतात. त्यामुळे नेहमीच या परिसरात चैतन्य असते. आमच्या या विठुमाऊलीच्या मंदिरात वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होत असतात. महिन्यातून एकदा श्री गजानन महाराजांचे पारायण, दर बुधवारी हरीपाठ आणि प्रत्येक हिंदुधर्मातील सण उत्साहाने साजरे केले जातात. विशैष म्हणजे इथे महिलांचा समावेश जास्त असतो. आसपासच्या परिसरातील अनेक महीला उत्साहाने आणि आवडीने दररोज मंदिरात येतात. नित्य नियमांनी आरती व प्रसाद असतो आणि सायंकाळी भक्तीमय वातावरणातून घरी परताना दुसर्या दिवशीची मंदिरात येण्याची ओढ सोबत घेऊन जातात.
मंदिर छोटच आहे पण भक्तीभाव मोठा आहे. आनंद देणारे आहे. विठुमाऊलीच्या दर्शनाने मन तृप्त होते. मंदिरातील नित्य पुजा आरतीमुळे वातावरण खूप प्रसन्न राहते. नुतन सोसायटीमधील प्रत्येक कुठुंब आणि आसपास परिसरातील अनेक कुठुंब यांना विठुमाऊलीच्या आशीर्वादाचा सदैव लाभ मिळतो. गेली अनेक वर्षा पासुन विठ्ठल रखुमाई आणि स्वयंभू देवीच्या मूर्तीची पुजापाठ होतो. विठुमाऊलीच्या दर्शनाला या आणि माऊलीच्या आशिर्वादाचा लाभ घेतात १९१८ साली. या मंदीराचे सुशोभिकरण करण्यात आले मंदीराचे अध्यक्ष राजेश खानोलकर सचिव विष्णूप्रसाद दळवी आणि सहकारी कार्यरत असतात येथील विवीध उपक्रमामध्ये येथील आजबाजुच्या महिलाचा मोठ्याप्रमाणात सहभाग असतो. नवरात्र उत्सवात दर दिवशी हरीपाठ ‘भजन’ दांडिया सह विविध उपक्रम पार पडतात अशा या मंदीराची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.