Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालतपूरमध्ये संतापाचा उद्रेक; डंपर अपघातानंतर रास्ता रोको, प्रशासनाविरोधात जनआक्रोश

मालतपूर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आंदोलनामुळे मालतपूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 06, 2026 | 01:18 PM
मालतपूरमध्ये संतापाचा उद्रेक; डंपर अपघातानंतर रास्ता रोको, प्रशासनाविरोधात जनआक्रोश

मालतपूरमध्ये संतापाचा उद्रेक; डंपर अपघातानंतर रास्ता रोको, प्रशासनाविरोधात जनआक्रोश

Follow Us
Follow Us:

वाई : पश्चिम भागातील मालतपूर (ता. वाई) येथे डंपरच्या भीषण धडकेत अभिजीत दत्तात्रय वाडकर या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण पश्चिम भागात तीव्र संताप उसळला. कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष गमावल्याने वाडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोन लहान मुलींच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मालतपूर–वाई रस्त्यावर आक्रमक ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनियंत्रित डंपर वाहतूक, बेकायदेशीर माती उपसा आणि प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेमुळेच ही दुर्घटना घडल्याचा ग्रामस्थांचा ठाम आरोप आहे.

“माती माफिया”वर ग्रामस्थांचा आक्रोश बेकायदेशीर माती उपसा व सुसाट धावणाऱ्या डंपर वाहतुकीमुळे संपूर्ण परिसर धोकादायक बनल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अपघातांची मालिका अनेक दिवसांपासून सुरूच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या दोन महिन्यांमध्ये पाच ते सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह पश्चिम भागातील अरुंद रस्ते, अपुऱ्या सुरक्षा सुविधा, रिफ्लेक्टरचा अभाव, दिशादर्शक फलकांची कमतरता तसेच पुलांवरील संरक्षक कठड्यांची अनुपस्थिती यामुळे रस्ते मृत्यूचा सापळा बनले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कर्नाटकमधील काँग्रेसच्या सरकारमध्ये मोठी घडामोड, शपथविधीनंतर 2 दिवसांतच मंत्री रामलिंगा रेड्डी यांचा राजीनामा

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच वारंवार अपघात होत असल्याचा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. डंपर चालक व बेकायदेशीर माती उपसा करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी घेतला. “दोषींवर तात्काळ कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू,” असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

मालतपूर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती

मालतपूर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आंदोलनामुळे मालतपूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे व प्रशासनाची धावपळ सुरू आहे.

तहसीलदारांच्या उपस्थितीची मागणी; आंदोलन तीव्र होण्याचा इशारा

“आता सहनशीलतेची सीमा संपली आहे. ठोस निर्णय आणि कारवाई होत नाही तोपर्यंत माघार नाही,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तहसीलदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

प्रशासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष

या संवेदनशील प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि बेकायदेशीर माती उपसा करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण वाई तालुक्याचे लक्ष लागले आहे.

राजकारण्यांनी अपघातग्रस्त कुटुंबाला शासकीय मदत मिळवून द्यावी

वाई तालुक्याचा पश्चिम भाग भक्ती शक्तीचा सांप्रदायाचा टाळकऱ्यांचा धारकऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा मानला जातो. धोम आणि बलकवडी धरणाच्या निर्मितीसाठी आपल्या भागाचा गावाचा शेतीचा त्याग करणाऱ्या पश्चिम भागातील लोकांना रस्त्यावर उतरावं लागणं खूप क्लेशदायक आहे. या प्रकरणांमध्ये राजकीय पुढार्‍यांनी राजकारण न करता अपघातग्रस्त कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्याकरता पुढाकार घ्यावा, अशी मागणी मालतपूर ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Outburst of anger in malatpur road blockade following dumper accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत
1

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत

Wai News: बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर! पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक
2

Wai News: बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर! पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक

Satara News: अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर; छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश
3

Satara News: अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर; छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश

‘व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल’; डॉ. नीलम गोऱ्हेंचे ‘महाराजस्व अभियान’वर मोठे विधान
4

‘व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल’; डॉ. नीलम गोऱ्हेंचे ‘महाराजस्व अभियान’वर मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.