Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar News : डहाणूची कन्या झेपावली अंतराळाकडे; उर्से गावाचा अभिमान उंचावला

डहाणू तालुक्यातील उर्से या आदर्श गावातील विद्यार्थिनी नेहा संदीप पाटील हिने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आयोजित ‘युविका 2026’ या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड मिळवत संपूर्ण पालघर जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 17, 2026 | 02:29 PM
Palghar News : डहाणूची कन्या झेपावली अंतराळाकडे; उर्से गावाचा अभिमान उंचावला
Follow Us
Follow Us:
  • डहाणूची कन्या झेपावली अंतराळाकडे
  • उर्से गावाचा अभिमान उंचावला
पालघर /संतोष पाटील : डहाणू तालुक्यातील उर्से या आदर्श गावातील विद्यार्थिनी नेहा संदीप पाटील हिने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आयोजित ‘युविका 2026’ या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड मिळवत संपूर्ण पालघर जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे. देशभरातून जवळपास पाच लाख अर्ज आले होते.ह्या अत्यंत स्पर्धात्मक असलेल्या या निवड प्रक्रियेत देशभरातून लाखो विद्यार्थ्यांमधून केवळ निवडक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये नेहाने आपले स्थान निश्चित केले आहे.

उर्से गावातील रहिवासी आणि एस.पी.एच. हायस्कूल, बोर्डी येथील इयत्ता 9 वीची विद्यार्थिनी असलेल्या नेहाने पालघर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, महाराष्ट्र राज्यातही अव्वल स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, राज्यातून निवड झालेल्या केवळ 14 विद्यार्थ्यांमध्ये तिचा समावेश असून, पालघर जिल्ह्यातील ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. या निवडीनंतर नेहाला येत्या 20 मेपासून तामिळनाडूमधील श्रीहरिकोटा येथील इस्रो केंद्रात दोन आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण (वर्कशॉप) घेण्याची संधी मिळणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान तिला अंतराळ विज्ञान, उपग्रह तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिक प्रयोगांचा थेट अनुभव मिळणार आहे.

जलजीवन मिशनमध्ये राज्यस्तरीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी; अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्याची 34 वर्षांची यशस्वी कारकीर्द

नेहाच्या या यशामुळे तिचे कुटुंब, शाळा, तसेच उर्से गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेहाचे वडील संदीप पाटील यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, “नेहाच्या मेहनती, जिद्द आणि अभ्यासातील सातत्यामुळेच तिला हे यश मिळाले आहे.”
उर्से गाव हे पालघर जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. या गावाला आध्यात्मिक वारसा लाभलेला असून, स्वाध्याय परिवारासह विविध अध्यात्मिक चळवळींचा गावावर प्रभाव आहे. याच सकारात्मक वातावरणामुळे गावातील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, मूल्ये आणि अभ्यासाबद्दलची ओढ निर्माण झाली असून, त्याचेच फलित म्हणून नेहासारखी विद्यार्थिनी आज अंतराळ क्षेत्रात झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे.नेहाच्या या यशामुळे संपूर्ण गावकऱ्यांकडून तिचा सत्कार करण्यात येत असून, भविष्यात ती आणखी प्रगती करून शाळा, गाव, जिल्हा आणि देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वसईत भक्तीचा महापर्व! ‘या’ दिवसापासून श्री बद्रीनाथ मंदिरात सुरु होणार ५ दिवसांचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा

 

Web Title: Palghar news neha sandeep patil a student from dahanu has made the entire palghar district proud by getting selected for the prestigious yuvika 2026 program organized by the indian space research orga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Palghar news

संबंधित बातम्या

30 जूनपासून कागदी नोटा बंद होणार; RBI आणणार प्लास्टिकच्या नोटा? सरकारने काय सांगितलं?
1

30 जूनपासून कागदी नोटा बंद होणार; RBI आणणार प्लास्टिकच्या नोटा? सरकारने काय सांगितलं?

LPG Subsidized Cylinder : सरकारकडून मोठा खुलासा! ‘या’ कारणासाठी सब्सिडी सिलेंडरची संख्या केली कमी
2

LPG Subsidized Cylinder : सरकारकडून मोठा खुलासा! ‘या’ कारणासाठी सब्सिडी सिलेंडरची संख्या केली कमी

Amir Khan कडून जंगी पार्टी, ‘लगान’ आणि ‘आमिर खान प्रॉडक्शन्स’ला 25 वर्षे पूर्ण, 13 जूनला कोण राहणार उपस्थित?
3

Amir Khan कडून जंगी पार्टी, ‘लगान’ आणि ‘आमिर खान प्रॉडक्शन्स’ला 25 वर्षे पूर्ण, 13 जूनला कोण राहणार उपस्थित?

Global Solar रँकिंगमध्ये अदाणींचा डंका! सर्वोच्च स्थान पटकावत रचला इतिहास; टॉप 10 मध्ये स्थान मिळवणारी देशातील एकमेव कंपनी
4

Global Solar रँकिंगमध्ये अदाणींचा डंका! सर्वोच्च स्थान पटकावत रचला इतिहास; टॉप 10 मध्ये स्थान मिळवणारी देशातील एकमेव कंपनी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.