Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC Bus Accident : धावत्या एसटीचे चाक निखळले; अर्धा किलोमीटर एका चाकावर धावली बस, ५० प्रवाशांचे थरारक बचाव

MSRTC Bus Accident News Marathi : पालघर जिल्ह्यात ठाणे-जव्हार मार्गावरील एसटी बसचे मागील चाक अचानक निखळून पडले. चालकाच्या लक्षात न आल्याने बस तब्बल अर्धा किलोमीटर एका मागील चाकावर धावत राहिली. त्यानंतर दुसरा टायरही फुटला, मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवल्याने ५० प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 29, 2026 | 02:15 PM
धावत्या एसटीचे चाक निखळले; अर्धा किलोमीटर एका चाकावर धावली बस, ५० प्रवाशांचे थरारक बचाव

धावत्या एसटीचे चाक निखळले; अर्धा किलोमीटर एका चाकावर धावली बस, ५० प्रवाशांचे थरारक बचाव

Follow Us
Follow Us:
  • एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार समोर
  • धावत्या एस टी बसचे चाक निखळले
  • 50 प्रवासी बचावले
संतोष पाटील, पालघर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसच्या देखभाल आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. ठाणे ते जव्हार दरम्यान धावणाऱ्या जव्हार आगाराच्या एसटी बसचे मागील चाक अचानक निखळून पडले. एवढेच नव्हे, तर चालकाच्या लक्षात ही बाब त्वरित न आल्याने बस तब्बल अर्धा किलोमीटर एका मागील चाकावरच धावत राहिली. सुदैवाने चालकाने वेळेवर बस थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली.

नेहरोलीजवळ घडली घटना

ठाणेहून जव्हारकडे निघालेली एसटी बस वाडा-भिवंडी महामार्गावरील नेहरोली परिसरात पोहोचली असताना अचानक बसचे मागील एक चाक निखळून रस्त्यावर पडले. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला चालक आणि वाहक यांच्या ही घटना लक्षात आली नाही. त्यामुळे बस सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत एका मागील चाकावरच पुढे जात राहिली. याचदरम्यान बसचा दुसरा मागील टायरही फुटल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली.

Ravindra Chavan : ठाणे-पालघर डीसीसी बँक निवडणुकीत महायुतीची ताकद पणाला; परिवर्तन पॅनलसाठी रवींद्र चव्हाण मैदानात

चालकाच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ

दुसरा टायर फुटल्यानंतर बसवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत तत्काळ बस सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यामुळे संभाव्य भीषण अपघात टळला.

बसमध्ये होते ५० प्रवासी

या एसटी बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर प्रवाशांचा समावेश होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

एसटीच्या देखभालीवर प्रश्न

या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या वाहन देखभाल आणि तांत्रिक तपासणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नियमित तपासणी होत असताना धावत्या बसचे चाक कसे निखळले, याची चौकशी करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वेळेवर चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते, तर ही घटना मोठ्या दुर्घटनेत बदलली असती, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.

Palghar Crime: माझ्या टोकाच्या पाऊलाला तेच जबाबदार…; वरिष्ठांच्या मानसिक त्रासाचा आरोप करत 57 वर्षीय अधिकाऱ्याची आत्महत्या

Web Title: Palghar st bus wheel came off ran half km major accident averted news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Bus Accident
  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी
1

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी
2

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी

MSRTC Smart Card : 1 सप्टेंबरपासून एसटी प्रवासासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य; पात्र लाभार्थ्यांना नोंदणीचे आवाहन
3

MSRTC Smart Card : 1 सप्टेंबरपासून एसटी प्रवासासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य; पात्र लाभार्थ्यांना नोंदणीचे आवाहन

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ११ ऑगस्टला ८६ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन
4

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ११ ऑगस्टला ८६ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.