Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Eco Sensitive Zone : वाडा, मोखाड्यातील जमिनींना नव्या पाबंदी? केंद्राचा निर्णय; पालघरमध्ये 126 गावे इको-सेन्सिटिव्ह कक्षेत

Palghar Eco Sensitive Zone : पश्चिम घाटातील जैवविविधता आणि जंगलांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने पालघर जिल्ह्यातील तब्बल १२६ गावांचा समावेश 'इको-सेन्सिटिव्ह झोन'मध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वाडा, मोखाडा, विक्रमगड आणि तलासरी परिसरातील गावांचा समावेश आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 18, 2026 | 11:50 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पश्चिम घाट संरक्षणासाठी केंद्राचा मोठा निर्णय!
  • पालघर जिल्ह्यातील १२६ गावे ‘इको-सेन्सिटिव्ह’ कक्षेत!
  • विकासकामांवर आणि उद्योगांवर कडक निर्बंध
Palghar Eco Sensitive Zone : पश्चिम घाटातील जैवविविधता आणि नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्याच्या केंद्राच्या प्रस्तावित आराखड्यात पालघर जिल्ह्यातील तब्बल १२६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी आणि पालघर तालुक्यातील डोंगरदऱ्यांतील गावांचा यात समावेश असून, या भागातील जंगल, वन्यजीव आणि जलस्त्रोतांचे संरक्षण करण्यासाठी भविष्यात विविध विकासकामांवर कडक पर्यावरणीय नियम लागू होण्याची शक्यता आहे.( Palghar Eco Sensitive Zone ) 

Vasai Virar News : हॉटेल-डेअरींवर कारवाई, मग खाऊगल्ल्यांना मोकळे रान का? FDA च्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह

केंद्राच्या पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयाने ३१ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप अधिसूचनेत पश्चिम घाटातील महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील मोठ्या क्षेत्राचा समावेश प्रस्तावित केला आहे. महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील २ हजार ५१५ गावांचा या प्रस्तावित पश्चिम घाट इको-सेंसिटिव्ह क्षेत्रात समावेश असून, त्यापैकी पालघरमधील १२६ गावे आहेत.

पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता

पालघरमधील प्रस्तावित संवेदनशील क्षेत्रात वाडा विभागातील ५८, मोखाड्यातील १० आणि तलासरीसह इतर डोंगराळ भागातील गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये जंगल, डोंगर उतार, जलस्रोत आणि जैवविविधतेचा मोठा साठा असल्याने अनियंत्रित उत्खनन, पृक्षतोड आणि बांधकामामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे. इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या क्षेत्राभोवती पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील पट्टा असून या क्षेत्रात विकास पूर्णपणे बंद करण्याऐवजी पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या उपक्रमांवर नियंत्रण ठेवण्याची तरतूद असते.

पारंपरिक उपजीविकेवर अनावश्यक निर्बंध नको

दरम्यान, इको सेन्सिटिव्ह झोन लागू करताना पर्यावरण संरक्षणासोबतच स्थानिकांच्या पारंपरिक उपजीविकेवर अनावश्यक निर्बंध येऊ नयेत, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे, अन्यथा भूमीपूत्रांच्या हक्कांवर गदा येण्याची भिती असून प्रस्ताव अंतिम करताना ग्रामस्थांच्या हरकती, स्थानिक गरजा आणि रोजगाराच्या सधीचा विचार करण्याची मागणी केली जात आहे.

जलस्रोतांच्या संरक्षणाला मिळणार अधिक महत्त्व

वाडा, मोखाडा आणि तलासरी परिसरातील डोंगराळ भागात वाढते बांधकाम, वृक्षतोड आणि उत्खननामुळे पर्यावरणाचा हास होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर इको सेन्सिटिव्ह दर्जा लागू झाल्यास वनक्षेत्र, वन्यजीव अधिवास आणि नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणाला अधिक महत्त्व मिळणार आहे.

प्रस्तावित प्रकल्पांवर परिणाम होण्याची शक्यता

प्रस्तावित नियमानुसार दगडखाणी, वीटभट्ट्या, आरागिरण्या यासारख्या पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या उद्योगावर कठोर निर्बंध येऊ शकतात. मोठ्या बांधकाम प्रकल्पांनाही पर्यावरणीय मंजुरी आणि नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे वाडा आणि मोखाडा परिसरात निसर्ग पर्यटन, रिसॉर्ट आणि ‘सेकंड होम ‘च्या नावाखाली सुरू असलेल्या प्रस्तावित प्रकल्पांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Nalasopara News Lizard In Cake : धक्कादायक! केकमध्ये आढळली पाल, नालासोपाऱ्यात खळबळ… 11 जणांची प्रकृती बिघडली

Web Title: Palghar eco sensitive zone rules and impact on wada mokhada villages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Forest Range
  • maharashtra
  • Marathi News
  • palghar

संबंधित बातम्या

Breaking News :अमेरिकेच्या रोजगार बाजाराला धक्का; नव्या नोकऱ्यांची भर केवळ २९ हजार, बेरोजगारी ४.२%
1

Breaking News :अमेरिकेच्या रोजगार बाजाराला धक्का; नव्या नोकऱ्यांची भर केवळ २९ हजार, बेरोजगारी ४.२%

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
2

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Nagpur Sport :व्हीएचएला पुन्हा धक्का; हॉकी मैदानाचा भाडेपट्टा रद्द
3

Nagpur Sport :व्हीएचएला पुन्हा धक्का; हॉकी मैदानाचा भाडेपट्टा रद्द

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा
4

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.