Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Flood: अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर! 7 हजारांहून अधिक कुटुंबांना आर्थिक मदत; 3.66 कोटी थेट खात्यात

जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे पालघर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने मदतकार्य आणि पंचनाम्यांची मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. आतापर्यंत ७,४६९ पूरग्रस्त कुटुंबांच्या बँक खात्यात ३ कोटी ६६ लाख रुपये थेट जमा करण्यात आले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 28, 2026 | 11:40 AM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पालघर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर!
  • 7 हजारांहून अधिक कुटुंबांना आर्थिक मदत
  • अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर 3.66 कोटी थेट खात्यात
Palhar Flood Relief:  जुलै महिन्यातील दोन टप्प्यांतील अतिवृष्टीने पालघर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असताना जिल्हा प्रशासनाने मदत वितरण आणि पंचनाम्यांची मोहिम युद्धपातळीवर सुरू केली आहे. आतापर्यंत ७ हजार ४६९ पूरग्रस्त कुटुंबांच्या खात्यात ३ कोटी ६६ लाखांची आर्थिक मदत जमा करण्यात आली असून अतिवृष्टीत मृत्यू झालेल्या १२ जणांच्या वारसांना ४८ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित सर्व पात्र लाभाथ्यर्थ्यांना शासन नियमानुसार मदत देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी दिली.

पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! वसईतील धबधबे, किनारे अन् निसर्ग पर्यटनस्थळांवर बंदी; उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई

यंत्रणा सज्ज करत मदतकार्याला गती

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तसेच २२ ते २४ जुलैदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीत हजारो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. घरांमध्ये पाणी शिरणे, घरांची पडझड, पशुधनाची हानी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अशा विविध प्रकारच्या आपत्तींनंतर जिल्हा प्रशासनाने महसूल विभागासह सर्व यंत्रणा सज्ज करत मदतकार्याला गती दिली आहे. अतिवृष्टीत मृत्यू झालेल्या २० जणांच्या प्रकरणांपैकी १२ पात्र वारसांना प्रत्येकी शासन नियमानुसार मदत देत ४८ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये वारसांची पडताळणी आणि आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

१५४७२ – पूरग्रस्त कुटुंबियांची नोंद
७४६९ – पात्र कुटुंबांची मदत जमा

जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

२२ ते २४ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीत तलासा, डहाणू आणि पालघर तालुक्यातील ७ हजार ५०३ घरांमध्ये पाणी शिरले असून त्यापैकी ३ हजार ४५० पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे महसूल यंत्रणेकडून प्राधान्याने सुरू असून, कोणताही पात्र लाभार्थी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासन २४ तास कार्यरत आहे, असे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी स्पष्ट केलं.

घरे, झोपड्या आणि गोठ्यांचे झाले नुकसान

घरांच्या नुकसानीच्या प्रकरणांमध्ये पूर्ण आणि अंशतः पडझड झालेल्या घरे, झोपड्या आणि गोठ्यांसाठी आतापर्यंत २४ लाख ९५ हजार, तर पशुधन नुकसानीच्या प्रकरणांमध्ये ३ लाख २२ हजार रुपयांचे देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे प्राथमिक नुकसान सुमारे १४८ कोटी तर जुलैच्या पहिल्या आठवड्यातील एकूण प्राथमिक नुकसान सुमारे

थेट बँकेतील खात्यात जमा झाली आर्थिक मदत

जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत १५ हजार ४७२ पूरग्रस्त कुटुंबांची नोंद करण्यात आली त्यापैकी ७ हजार ४६९ पात्र कुटुंबाना शासन नियमानुसार ३ कोटी ६६ लाख ३१ हजार ५७५ इतकी असून आर्थिक मदत थेट बैंक खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे बैंक तपशील आणि आवश्यका कागदपत्रे पूर्ण होताच मदत वितरण केले जाणार आहे.

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही

Web Title: Palghar flood relief 3 point 66 crore distributed to affected families see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Business News
  • Heavy Rain
  • Loss Compensation
  • mansoon
  • Marathi News
  • palghar

संबंधित बातम्या

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
1

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
3

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
4

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.