Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Flood Relief : पालघरमधील पूरग्रस्तांना मोठा दिलासा! राज्य सरकारकडून विशेष मदतीची घोषणा; बँक खात्यात जमा होणार पैसे

Palghar Flood Relief : जुलै महिन्यात पालघर जिल्हा आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रात झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या नागरिकांना राज्य सरकारने मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने विशेष शासन निर्णय जारी करत मदतीची घोषणा केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 05, 2026 | 11:33 AM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पालघरमधील पूरग्रस्तांना मोठा दिलासा!
  • राज्य सरकारकडून विशेष मदतीची घोषणा
  • बँक खात्यात जमा होणार पैसे
Palghar Flood Relief : पालघर जिल्हा आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रात झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने विशेष शासन निर्णय जारी करून पूरग्रस्तांसाठी विविध प्रकारच्या आर्थिक मदतीची घोषणा ( Palghar Flood Relief ) केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.
४ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या विक्रमी पावसामुळे वसई-विरार आणि पालघर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. हजारो घरे, दुकाने, व्यावसायिक आस्थापना, पशुधन आणि उपजीविकेची साधने बाधित झाली होती.

विरार स्थानक होणार हायटेक! चौपदरीकरण प्रकल्पाला वेग, पुनर्विकास अंतिम टप्प्यात; प्रवाशांना मिळणार ‘या’ सुविधा

पुनर्वसनासाठी मोठा आधार

या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांसाठी महापौर अजीव पाटील, आमदार स्नेहा दुबे, आमदार राजन नाईक यांच्यासह जिल्ह्यातील इतरही लोकप्रतिनिधींनी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली होती. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी निश्चित करून मदतीची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असून त्याचा तपशील जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. या निर्णयामुळे पूरग्रस्त नागरिकांना आर्थिक पुनर्वसनासाठी मोठा आधार मिळणार आहे.

पूरग्रस्त कुटुंबांसाठी असे राहणार पॅकेज

पूरामुळे स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना कपडे आणि घरगुती वस्तूंच्या नुकसानीपोटी प्रत्येकी १० हजार रुपये, म्हणजेच एकूण २० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासाठी घर सलग ४८ तास पाण्यात बुडालेले असण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.
पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी १ लाख ५० हजार रुपये, तर अंशतः नुकसान झालेल्या घरांसाठी नुकसानीच्या प्रमाणानुसार १५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. घोषित झोपडपट्टीतील पात्र झोपड्यांच्या नुकसानीसाठी १५ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

फडणवीस यांच्याकडे विशेष मदतीची मागणी

वसई-विरारमधील हजारो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले होते. त्या काळात आम्ही प्रत्यक्ष पूरग्रस्त भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष मदतीची मागणी केली होती. राज्य शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेत पूरग्रस्तांसाठी विशेष मदत जाहीर केली, याबद्दल मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार. ही मदत नागरिकांना पुन्हा उभे राहण्यासाठी निश्चितच मोठा आधार ठरेल, असं विधान महापैर अजीव पाटील यांनी केले.

व्यावसायिकांसाठी मदत

दुकानदार, टपरीधारक, हस्तकला व हातमाग कारागीर, बारा बलुतेदार, मच्छीमार व पशुपालकांनाही विशेष आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. दुकानदारांना प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के किंवा कमाल ५० हजार रुपये, तर टपरीधारकांना १० हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. मृत दुभत्या जनावरासाठी ४० हजार रुपये, पूर्ण नुकसान झालेल्या मच्छीमार बोटीस २५ हजार रुपये तसेच जाळे व कुक्कुटपालनाच्या नुकसानीसाठीही स्वतंत्र मदतीची तरतूद करण्यात आली आहे.

Vasai News : गोळीबाराने केला दारुधंद्याचा भांडाफोड, रिसॉर्टमालकावर कारवाईचा फार्स; ग्रामस्थांचा संताप

Web Title: Palghar flood relief package heavy rainfall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • flood
  • Flood situation
  • Marathi News
  • palghar
  • Palghar news

संबंधित बातम्या

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…
1

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…

Palghar PWD Scam : पीडब्ल्यूडीत 73 लाखांचा घोटाळा, बनावट दस्तऐवज तयार; ‘अभिप्राया’च्या नावाखाली FRI रोखला
2

Palghar PWD Scam : पीडब्ल्यूडीत 73 लाखांचा घोटाळा, बनावट दस्तऐवज तयार; ‘अभिप्राया’च्या नावाखाली FRI रोखला

Maharashtra Today’s Live News in Marathi:  मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
4

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.