Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Coastline News: विकासाच्या नावाखाली विस्थापन मान्य नाही! सफाळे पश्चिम किनारपट्टीवर जनआंदोलन तीव्र; ग्रामस्थ आक्रमक

पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम किनारपट्टी परिसरात प्रस्तावित विमानतळ आणि MIDC प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. एडवण, उसरणी, भादवे, कोरे आणि दातिवरेसह अनेक गावांतील शेती, मत्स्य व्यवसाय आणि पारंपरिक उपजीविका वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी आशापुरी देवीच्या मंदिरात एकत्र येत सामूहिक प्रार्थना केली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 29, 2026 | 12:08 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘जमीन-समुद्र-अस्तित्वा’चा लढा
  • विकासाच्या नावाखाली विस्थापन मान्य नाही!
  • विमानतळ-एमआयडीसीविरोधात एकवटली किनारपट्टी
Palghar News :  पालघर जिल्ह्यातील सफाळे परिसरातील प्रस्तावित विमानतळ आणि एमआयडीसी प्रकल्पांविरोधातील जनआंदोलनाला आता धार्मिक आणि सामाजिक एकजुटीची जोड मिळू लागली आहे. सफाळे पश्चिम किनारपट्टी परिसरातील ग्रामस्थांनी आशापुरी मातेच्या मंदिरात एकत्र येत आपल्या जमिनी, समुद्र, शेती, मत्स्य व्यवसाय आणि गावांचे अस्तित्व कायम राहावे, यासाठी सामूहिक प्रार्थना केली. विकासाच्या नावाखाली होणारे विस्थापन कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नसल्याचा निर्धार व्यक्त करत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.

Palghar Flood: अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर! 7 हजारांहून अधिक कुटुंबांना आर्थिक मदत; 3.66 कोटी थेट खात्यात

प्रस्तावित विमानतळ आणि औद्योगिक विकासासाठी एमआयडीसी उभारणीमुळे एडवण, उसरणी, भादवे, कोरे, दातिवरेसह सफाळे पश्चिम किनारपट्टीवरील अनेक गावांतील शेती, खारफुटी, वाड्या-वस्त्या आणि पारंपरिक मत्स्य व्यवसाय धोक्यात येईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

हजारो मच्छीमारांच्या उपजीविकेवर संकट

समुद्रात होणारे भराव, खोदकाम आणि अन्य विकासकामांमुळे सागरी जैवविविधतेवर गंभीर परिणाम होऊन हजारो मच्छीमारांच्या उपजीविकेवर संकट ओढवू शकते, असा मुद्दा बैठकीत ठळकपणे मांडण्यात आला. सभेत महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. हा संघर्ष केवळ जमिनीसाठी नाही, तर आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, गावांच्या अस्तित्वासाठी आणि सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी आहे, असे मत अनेक महिला आणि ग्रामस्थांनी व्यक्त केले. महिलांनीही भविष्यातील सर्व आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

आंदोलनापासून ठेकेदारांना ठेवणार दूर

बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करताना भराव, मुरूम, माती पुरवठा किंवा ठेकेदारीशी संबंधित कोणत्याही व्यक्ती अथवा घटकांना आंदोलनात स्थान दिले जाणार नाही, असा निर्णयही घेण्यात आला. हा संघर्ष पूर्णपणे स्थानिकांच्या हक्कांसाठी असून तो लोकशाही, संविधानिक आणि शांततामय मार्गानेच लढला जाईल, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

हा लढा केवळ एका गावापुरता मर्यादीत नसून ७८ संपूर्ण किनारपट्टीच्या अस्तित्याचा प्रश्न आहे त्यामुळे ग्रामस्थानी संघटीत राहून प्रत्येक गावात जनजागृती मोहिम व्यापक करण्याची गरज असल्याचं वाढवण बचाव समितीचे विनित पाटील यांनी सांगितलं.

जमीन, समुद्र वाचला तरच भविष्य वाचणार

यावेळी परिसरातील विविध गावांतील ग्रामस्थ, महिला, युवक व वाढवण बचाव समितीचे पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते. आशापुरी मातेच्या चरणी साकडे घालत जमीन वाचली तर गाव वाचेल, समुद्र वाचला तर भविष्य वाचेल, असा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. ग्रामस्थांनी विकासाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, स्थानिकांचे विस्थापन, पर्यावरणाची हानी आणि पारंपरिक उपजीविकेचा हास स्वीकारला जाणार नसल्याची ठाम भूमिका पुन्हा अधोरेखित केली.

Vasai News : ‘धोकादायक इमारती तातडीने खाली करा…’, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांचा इशारा

Web Title: Saphale proposed airport and midc project protest by coastal villagers palghar news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Business News
  • fishermen
  • Marathi News
  • MIDC
  • palghar
  • Palghar news
  • Protest

संबंधित बातम्या

Govt Action Mode: 1ऑगस्टपासून सरकार ॲक्शन मोडवर! साखर साठ्याबाबत घेतला मोठा निर्णय, व्यापाऱ्यांवर कडक नजर
1

Govt Action Mode: 1ऑगस्टपासून सरकार ॲक्शन मोडवर! साखर साठ्याबाबत घेतला मोठा निर्णय, व्यापाऱ्यांवर कडक नजर

Pune ZP Budget 2026: पुणे जिल्हा परिषदेचे ३३३ कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर; ३२ कोटींची वाढ
2

Pune ZP Budget 2026: पुणे जिल्हा परिषदेचे ३३३ कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर; ३२ कोटींची वाढ

Raigad News: ‘म्युल अकाऊंट’ धारकांवर रायगड पोलिसांची धडक कारवाई; ३५ कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश
3

Raigad News: ‘म्युल अकाऊंट’ धारकांवर रायगड पोलिसांची धडक कारवाई; ३५ कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश

खोल समुद्रात आता नेटवर्कची चिंता नाही! ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’तून मच्छिमारांना मिळाला सॅटेलाइट फोन’
4

खोल समुद्रात आता नेटवर्कची चिंता नाही! ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’तून मच्छिमारांना मिळाला सॅटेलाइट फोन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.