Photo Credit- Social Media
पालघर: शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना पालघर विधानसभेची उमेदवारी न दिल्यामुळे ते चांगलेच नाराज झाले होते. नाराज झाल्यामुळे आणि तणावात ते गेल्या 36 तासांपासून नॉटरिचेबल होते. त्यांच्या पत्नी सुमन वगना यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली होती. त्यानंतर अखेर ते 36 तासांनंतर घरी आले,कुटुंबियांना भेटले आणि लगेच निघूनही गेले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची चिंता अधिकच वाढली आहे.
त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास वनगा काल मध्यरात्री घरी आले, ते अचानक घरातून निघून गेल्यामुळे कुटुंबियाची काळजी वाढली होती. त्यामुळे 36 तासांनंतर ते काल मध्यरात्री घरी आले. पण आपल्याला आरामाची गरज आहे.काही दिवस अज्ञातवासात राहण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण अजून दोन तीन दिवस बाहेरगावी जात आहोत, असे सांगून ते पुन्हा निघून गेले. ते भेटून गेल्यानंतर आम्हाला दिलासा मिळाला.
हेही वाचा: गुगलच्या जाहिरात पॉलिसीमध्ये बदल, छोट्या व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता
पालघर विधानसभाचे तिकीट नाकारल्यानंतर विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा फारच दु:खी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन देऊनही त्यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे ते फारच नैराश्यात गेले होते. त्या दु:खात ते अक्षरश: ढसाढसा रडलेही. त्यानंतर परवा मध्यरात्री कोणालाही कल्पना न देता ते घरातून बाहेर पडले. त्यानंतर जवळपास 36 तास ते नॉटरिचेबल होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची चिंताही वाढली होती. पण 36 तासांनंतर ते पुन्हा घरी आले, कुटुंबियांना भेटले आणि मला आरामाची गरज आहे असं सांगून ते पुन्हा निघून गेले.
शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना महाराष्ट्रातील पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती, मात्र सोमवारी (28 ऑक्टोबर) या जागेवरून दुसऱ्या उमेदवाराचे नाव जाहीर झाल्याने वनगा दु:खी झाले. तिकीट कापल्यावर तर ते अक्षरश: रडायला लागले होते. एकना शिंदे यांच्या शिवसेनेने राजेंद्र गावित यांना पालघरमधून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपला विश्वासधात केल्याचा आरोही वनगा यांनी केला होता.
हेही वाचा: ‘जनतेत महाविकास आघाडीची लाट, मला विजयाची शंभर टक्के खात्री; माजी आमदार प्रभाकर घार्गे यां
दरम्यान पक्षा प्रवेश देण्यापूर्वी राजेंद्र गावित यांन श्रीनिवास वनगा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांना डहाणू मतदार संघात भाजपातर्फे उमेदवारी दिली जाईल, असेही आश्वासन देण्यात आले होते. पण भाजपाने विनोद मेढा यांना डहाणू मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या भावनांचा बांध फुटला आणि ते ढसाढसा रडू लागले.