File Photo : Satara Politics
दहिवडी : मला विजयाची शंभर टक्के खात्री आहे. आम्ही सर्वजण सामंजस्याने दोन पावलं मागं येऊन एकत्र आलो आहोत. सर्व नेतेमंडळी, सर्व संघटनांना एकत्र घेऊन या लढाईला सामोरे जाण्यास मी सज्ज झालो आहे. जनतेत महाविकास आघाडीची लाट असून, महाराष्ट्रासह माण-खटाव मध्ये परिवर्तन अटळ असल्याचे प्रभाकर घार्गे यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : उद्योग विभागाकडून विधानसभा मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर! विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना 20 नोव्हेंबरला सुट्टी
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाकर घार्गे यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, सुरेंद्र गुदगे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रभाकर घार्गे म्हणाले, ‘ज्यांना ज्यांना गेल्या 15 वर्षांत त्रास झाला, त्यांना त्यांना न्याय देण्यासाठी मी ही निवडणूक लढवतोय. गेली कित्येक वर्ष काम सुरु असलेला पाणीप्रश्न पुर्णपणे सोडवणं. या मतदारसंघात औद्योगिक क्रांती घडवणं. तसेच चांगल्या विचाराचं, शांततेचं वातावरण निर्माण करुन कोणत्याही व्यक्ती अथवा समाजाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. माण-खटावला लागलेला दहशतीचा कलंक पुसण्याचं काम मी करणार आहे’.
ही निवडणूक कार्यकर्त्यांनी घ्यावी हाती
तसेच शांततेचं, विकासाचं व समाजाच्या उपयोगाचं राजकारण आम्ही करणार आहोत. ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घ्यावी. सगळ्यांना न्याय देणं अन् सन्मान देणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी योग्य पद्धतीने पार पाडेन. शिक्षण, समाजकारण, उद्योग, सहकार आणि राजकारण या सर्व क्षेत्रात मी काम करतोय. उद्योगधंद्यांच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी मी घेतोय, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहितेच्या काळात नेमके काय करावे आणि काय करु नये ?