Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokulashtami 2026: कला अन् कृष्णभक्तीचा सुंदर संगम; वसईच्या कलाकाराने बासरीवर रेखाटले श्रीकृष्ण

Gokulashtami 2026: गोकुळाष्टमीनिमित्त वसईतील चित्रकार कौशिक जाधव यांचे शिष्य जय कल्पेश शहा यांनी अनोख्या पद्धतीने श्रीकृष्णाला कलेतून अभिवादन केले आहे. जयने चक्क बासरीवर वॉटर कलर्सच्या माध्यमातून श्रीकृष्णाचे सुंदर चित्र साकारले. अवघ्या एका तासात पूर्ण केलेल्या या कलाकृतीत कला, कल्पकता आणि कृष्णभक्तीचा सुंदर संगम पाहायला मिळाले

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 05, 2026 | 11:43 AM
कला अन् कृष्णभक्तीचा सुंदर संगम; वसईच्या कलाकाराने बासरीवर रेखाटले श्रीकृष्ण

कला अन् कृष्णभक्तीचा सुंदर संगम; वसईच्या कलाकाराने बासरीवर रेखाटले श्रीकृष्ण

Follow Us
Follow Us:
  • गोकुळाष्टमीनिमित्त बासरीवर अवतरले श्रीकृष्ण!
  • बासरीच बनली कॅनव्हास!
  • अवघ्या तासाभरात साकारले श्रीकृष्णाचे मनमोहक चित्र
निलेश महाडीक, वसई : गोकुळाष्टमी म्हटलं की भगवान श्रीकृष्ण, त्यांची बासरी आणि दहीहंडीचा उत्साह डोळ्यांसमोर उभा राहतो. याच श्रीकृष्णाच्या बासरीला कॅनव्हास बनवत वसईतील युवा कलाकाराने अनोखी कलाकृती साकारली आहे. चित्रकार कौशिक जाधव यांचे शिष्य जय कल्पेश शहा यांने गोकुळाष्टमीनिमित्त (Gokulashtami 2026) चक्क बासरीवर श्रीकृष्णाचे आकर्षक चित्र रेखाटले आहे.

सामान्यतः चित्र रेखाटण्यासाठी कागद, कॅनव्हास किंवा मोठ्या पृष्ठभागाचा वापर केला जातो. मात्र जयने यासाठी वेगळा प्रयोग करत बासरीसारख्या अत्यंत अरुंद पृष्ठभागाची निवड केली. विशेष म्हणजे वॉटर कलर्सच्या माध्यमातून ही कलाकृती साकारण्यात आली आहे.

Travel News : भारतातील 3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या

बासरीचा पृष्ठभाग अरुंद आणि आकाराने गोलाकार असल्यामुळे त्यावर चित्र रेखाटणे हे कलाकारासाठी आव्हानात्मक काम असते. रंगांचा योग्य वापर, ब्रशवरील नियंत्रण आणि चित्रातील बारकावे सांभाळत जयने अवघ्या एका तासात श्रीकृष्णाचे चित्र पूर्ण केले.

या कलाकृतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्रीकृष्ण आणि बासरी यांचे असलेले अतूट नाते. श्रीकृष्णाच्या हातातील बासरी ही त्यांच्या प्रतिमेचा अविभाज्य भाग मानली जाते. त्याच बासरीवर श्रीकृष्णाचे चित्र साकारल्याने या कलाकृतीला वेगळे प्रतीकात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे.

कलाकृतीसाठी कॅनव्हास

चित्रकार कौशिक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जयने ही कलाकृती साकारली. पारंपरिक कॅनव्हासच्या चौकटीबाहेर जाऊन वेगवेगळ्या वस्तूंवर कला साकारता येऊ शकते, हे या प्रयोगातून दाखवून देण्यात आले आहे.

‘कलेला पारंपरिक कॅनव्हासची गरज नसते; कल्पकता असेल तर कोणताही पृष्ठभाग कलाकृतीसाठी कॅनव्हास बनू शकतो,’ हा संदेशही या कलाकृतीतून अधोरेखित होत आहे. गोकुळाष्टमीच्या उत्सवी वातावरणात साकारलेल्या या अनोख्या कृष्णचित्राचे कला क्षेत्रातून कौतुक होत आहे.

श्रीकृष्णाला बासरी प्रिय का असते?

श्रीकृष्णाच्या हातातील बासरीला ‘मुरली’ किंवा ‘वेणू’ असेही म्हटले जाते. भागवत परंपरेतील कृष्णवर्णनात त्यांच्या वेणुवादनाला विशेष स्थान आहे. कृष्णाच्या बासरीच्या मधुर स्वरांनी गोप-गोपी, गायी तसेच निसर्गही मोहित झाल्याचे काव्यमय वर्णन आढळते.

बासरीचे आणखी एक सुंदर आध्यात्मिक प्रतीक आहे. बासरी आतून पोकळ असते. भक्तीपरंपरेत याचा अर्थ अहंकाराचा त्याग असा लावला जातो. मनुष्याने अहंकार, द्वेष आणि स्वार्थ सोडून स्वतःला ईश्वराला समर्पित केले, तर जशी कृष्णाच्या श्वासामुळे साध्या बासरीतून मधुर संगीत निर्माण होते, तसेच त्याचे जीवनही सुंदर होऊ शकते, अशी त्यामागची भावना आहे.

बासरी प्रेम, आनंद, भक्ती आणि ईश्वराशी असलेल्या निःस्वार्थ नात्याचे प्रतीक म्हणूनही पाहिली जाते. त्यामुळे मोरपीस, बासरी आणि श्रीकृष्ण ही प्रतिमा भारतीय कला व भक्तीपरंपरेत एकमेकांशी घट्ट जोडली गेली आहे.

Janmashtami Song: ‘यशोमती मैया से बोले नंदलाला’ गाण्याची जादू कायम; लता दीदींच्या आवाजाने अजरामर झालेलं ४८ वर्षं जुनं भजन

Web Title: Vasai artist jay kalpesh shah paints lord krishna on flute for gokulashtami 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • maharashtra
  • vasai

संबंधित बातम्या

ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडींगला कायदेशीर परवानगी आहे? यासंबंधित तुम्ही कुठे आणि कशी तक्रार नोंदवू शकता? जाणून घ्या
1

ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडींगला कायदेशीर परवानगी आहे? यासंबंधित तुम्ही कुठे आणि कशी तक्रार नोंदवू शकता? जाणून घ्या

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! चिपळूण उड्डाणपुलाची गंभीर दखल; पूर्ण कामानंतरच होणार खुला
2

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! चिपळूण उड्डाणपुलाची गंभीर दखल; पूर्ण कामानंतरच होणार खुला

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा
3

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका
4

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.