Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! चिपळूण उड्डाणपुलाची गंभीर दखल; पूर्ण कामानंतरच होणार खुला

Navarashtra Impact: चिपळूण उड्डाणपुलाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुली करण्याच्या हालचालींबाबत नवराष्ट्रने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. या बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उड्डाणपुलाचे संपूर्ण काम पूर्ण झाल्याशिवाय तो वाहतुकीसाठी खुला केला...

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 04, 2026 | 06:54 PM
नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! चिपळूण उड्डाणपुलाची गंभीर दखल; पूर्ण कामानंतरच होणार खुला

नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! चिपळूण उड्डाणपुलाची गंभीर दखल; पूर्ण कामानंतरच होणार खुला

Follow Us
Follow Us:
  • नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट!
  • चिपळूण उड्डाणपुलाची गंभीर दखल
  • पूर्ण कामानंतरच होणार खुला
Navarashtra Impact: देशभरात ज्या सणाची आतुरतेने वाट पाहिली जातेय, तो सण म्हणजे गणेशोत्सव, सध्या ऑगस्ट महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. ज्यामुळे गणेशभक्तांना आता बाप्पांच्या आगमनाची आतुरता लागली आहे. याचदरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण उड्डाणपुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होती. मात्र उड्डाणपुलाचे अनेक काम अद्याप बाकी असल्याने अपूर्ण अवस्थेत तो वाहतुकीसाठी खुला केल्यास नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, हा मुद्दा नवराष्ट्र चॅनेलने ठळकपणे मांडला होता.

नवराष्ट्रच्या बातमीची दखल

नवराष्ट्रने उपस्थित केलेल्या सुरक्षेच्या मुद्द्यानंतर चिपळूण उड्डाणपुलाबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उड्डाणपुलाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. पुलाचे संपूर्ण काम पूर्ण झाल्याशिवाय तो वाहतुकीसाठी सुरू केला जाणार नसल्याचे त्यांनी मुलाखतीत सांगितले.

Ganeshotsav 2026: गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा काय सांगते? उजव्या सोंडेच्या बाप्पाच्या पूजेत का पाळतात कडक नियम?

गणेशोत्सवापूर्वी एक लेन सुरू करण्याची होती चर्चा

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी उड्डाणपुलाची एक लेन सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती. परंतु पुलाचे काम अपूर्ण असताना वाहतूक सुरू केल्यास वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडे नवराष्ट्रने लक्ष वेधले होते.

संपूर्ण काम झाल्यानंतरच उड्डाणपूल खुला

आता सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केल्यामुळे अपूर्ण अवस्थेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुलाचे उर्वरित काम पूर्ण करून आवश्यक सुरक्षेची खात्री झाल्यानंतरच वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी उड्डाणपुलाची एक लेन सुरू होण्याच्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाला असून, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतरच पूल खुला करण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

दरम्यान, सांस्कृतीक कार्यक्रमात होणाऱ्या डीजेच्या वापरावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेकांकडून डीजेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. पुण्यामध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे, या बैठकीमध्ये ते बोलत होते.

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात DJ-लेझरला ‘नो एन्ट्री’! विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास थेट कारवाई

Web Title: Navarashtra news impact chiplun flyover to open only after completion shivendraraje bhosale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • Chiplun
  • maharashtra
  • Navarashtra Impact

संबंधित बातम्या

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा
1

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका
2

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

Purandar Airport : …ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी
3

Purandar Airport : …ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी

Bhandara News: बाजारपेठेवर चढला जन्माष्टमीचा रंग! मूर्तिकारांची लगबग; पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तूंनी बाजार फुलला
4

Bhandara News: बाजारपेठेवर चढला जन्माष्टमीचा रंग! मूर्तिकारांची लगबग; पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तूंनी बाजार फुलला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.