Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडींगला कायदेशीर परवानगी आहे? यासंबंधित तुम्ही कुठे आणि कशी तक्रार नोंदवू शकता? जाणून घ्या

ग्रामीण भागात किती तास लोडशेडिंग कायदेशीर आहे आणि अचानक वीज गायब झाल्यास नागरिकांनी काय करावे? अतिरिक्त वीजखंडितीविरोधात महावितरण, CGRF आणि विद्युत लोकपालांकडे तक्रार करून भरपाईही मागता येऊ शकते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 04, 2026 | 11:21 PM
ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडींगला कायदेशीर परवानगी आहे? यासंबंधित तुम्ही कुठे आणि कशी तक्रार नोंदवू शकता? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • ग्रामीण भागातील कृषी आणि गावठाण फिडरसाठी वीजपुरवठा व लोडशेडिंगचे नियम वेगवेगळे लागू होतात.
  • अचानक किंवा अतिरिक्त वीजखंडिती झाल्यास नागरिक महावितरणच्या अधिकृत हेल्पलाइनवर तक्रार नोंदवून क्रमांक घेऊ शकतात.
  • प्राथमिक तक्रारीचे निवारण न झाल्यास CGRF आणि विद्युत लोकपालांकडे कायदेशीर प्रक्रियेद्वारे दाद मागता येते.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोडशेडिंगबाबत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) आणि महावितरण (MSEDCL) च्या नियमावलीनुसार ठरवून दिलेले निश्चित कायदेशीर निकष आणि ग्राहकांसाठी तक्रार निवारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

१. ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडिंगला कायदेशीर परवानगी आहे?

MERC च्या मानकांनुसार आणि वीज बिल वसुली आधारित प्रोटोकॉल नुसार वीज पुरवठ्याचे नियम ठरवले जातात,

  • कृषी वाहिनी: शेतीसाठी दिवसा ८ तास किंवा रात्री १० तास चक्राकार पद्धतीने वीज देण्याचे शासनाचे धोरण आहे. म्हणजेच उरलेले १४ ते १६ तास तांत्रिकदृष्ट्या लोडशेडिंग अधिकृत मानले जाते. ( बऱ्याचदा लोक शेती भागात(मळ्यात) राहत असतात. त्याची वीजही या नियमांखाली कापली जाऊ शकते)
  • ग्रामीण गावठाण वाहिनी: गावठाण फिडरवर कोणत्याही तांत्रिक कारणाशिवाय किंवा पूर्वसूचनेशिवाय लोडशेडिंग सामान्यतः ४ ते ८ तासांपेक्षा जास्त असणे बेकायदेशीर मानले जाते.
  • अघोषित लोडशेडिंगवर बंदी: MERC च्या नियमांनुसार पूर्वकल्पना न देता अचानक घेतलेले लोडशेडिंग हे सेवा त्रुटी मानले जाते. तांत्रिक बिघाड किंवा आपत्कालीन प्रसंग वगळता महावितरणला मनमानी लोडशेडिंग करता येत नाही.
MSEDCL : १२ लाख खर्च करून उभारलेल्या सोलर प्रकल्पावर ग्रीड सपोर्ट चार्जेस; वडगाव मावळ शेतकऱ्याची न्यायासाठी धाव

२. अतिरिक्त आणि बेकायदेशीर लोडशेडिंगविरुद्ध तक्रार कुठे व कशी करावी?

अतिरिक्त वीज खंडित होत असल्यास सामान्य नागरिक म्हणून टप्प्याटप्प्याने खालील ठिकाणी तक्रार नोंदवू शकता,

टप्पा १: महावितरणच्या अधिकृत वाहिन्यांवर प्राथमिक तक्रार

  • टोल-फ्री क्रमांक: 1800-233-3435 किंवा 1800-102-3435 (तक्रार नोंदवून तक्रार क्रमांक / Ticket ID नक्की घ्या).
  • व्हॉट्सॲप / एसएमएस: महावितरणच्या मोबाईल ॲप – MSEDCL App, किंवा 1912 वर मेसेज पाठवून.
  • लेखी तक्रार: स्थानिक कनिष्ठ अभियंता किंवा उपकार्यकारी अभियंता यांच्या ऑफिसमध्ये  पोचपावतीसह लेखी अर्ज द्या.
टप्पा २: अंतर्गत तक्रार निवारण कक्ष – CGRF – Consumer Grievances Redressal Forum

तुमचे जर प्राथमिक स्तरावर २४ ते ४८ तासांत निवारण झाले नाही तर:

  • MERC च्या नियमांनुसार प्रत्येक परिमंडळात ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यरत असतो.
  • तेथे ‘नमुना क’  भरून वीज वितरणाच्या निष्काळजीपणाविरुद्ध व अतिरिक्त लोडशेडिंगविरुद्ध अर्ज सादर करा. वीज वितारणासंबंधी इतर काही शंका किंवा तक्रारी तुम्ही इकडे नोंदवू शकता.
PM Surya Ghar Free Electricity Scheme: घरगुती वीजबिल होणार शून्य! प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत महाराष्ट्र ‘टॉपर

टप्पा ३: विद्युत लोकपाल

  • CGRF च्या निर्णयाने समाधान न झाल्यास किंवा ६० दिवसांत निर्णय न मिळाल्यास महाराष्ट्र राज्याच्या विद्युत लोकपाल यांच्याकडे अंतिम अपील करता येते.
३. कायदेशीर भरपाईचा हक्क

MERC Regulations, 2021 मधील तरतुदींनुसार,

  • अघोषित वीजखंड पडल्यास: ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ (उदा. २४ तासांपेक्षा जास्त वेळ वीज बंद राहिल्यास) वीजपुरवठा खंडित राहिल्यास महावितरणकडून प्रति तास किंवा प्रति दिवस रु. १०० ते रु. ५०० पर्यंत भरपाई मागण्याचा अधिकार ग्राहकाला आहे.
  • ही भरपाई मिळवण्यासाठी तक्रार निवारण मंचाकडे अर्ज करणे आवश्यक असते.
 

Web Title: Rural load shedding rules complaint process maharashtra auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 11:21 PM

Topics:  

  • LIFESTYLE
  • maharashtra
  • Maharashtra State Electricity Board

संबंधित बातम्या

FDA चा औषध माफियांना दणका! ६ महिन्यांत ४,७२३ तपासण्या, १,५८१ परवान्यांवर कारवाई; १५ जणांना अटक
1

FDA चा औषध माफियांना दणका! ६ महिन्यांत ४,७२३ तपासण्या, १,५८१ परवान्यांवर कारवाई; १५ जणांना अटक

Mangal Prabhat Lodha: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी वनस्टेप फाउंडेशन आणि NSDC सोबत सामंजस्य करार
2

Mangal Prabhat Lodha: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी वनस्टेप फाउंडेशन आणि NSDC सोबत सामंजस्य करार

Good Morning Messages: नवी उमेद, नवी ऊर्जा! दिवसाची सुरुवात करा ‘या’ प्रेरणादायी विचारांनी, मन होईल प्रसन्न
3

Good Morning Messages: नवी उमेद, नवी ऊर्जा! दिवसाची सुरुवात करा ‘या’ प्रेरणादायी विचारांनी, मन होईल प्रसन्न

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!
4

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.