Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Illegal Construction: वसईत बेकायदा बांधकामाला पालिकेचे अभय? तोडक पथक कारवाईशिवाय माघारी; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Vasai Illegal Construction: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर परिसरातील अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर तोडक कारवाई करण्यासाठी गेलेल्या वसई-विरार महापालिकेच्या पथकाने ऐनवेळी माघार घेतल्याने पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 07, 2026 | 11:21 AM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बेकायदा बांधकामाला अभय?
  • कारवाईनंतर ‘जैसे थे’ स्थिती
  • पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Vasai Illegal Construction: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर परिसरातील व्होल्टन हॉटेलमागील बेकायदा व्यावसायिक बांधकामावर कारवाईसाठी ( Vasai Illegal Construction  ) गेलेल्या वसई-विरार महापालिकेच्या पथकाने ऐनवेळी माधार घेतल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही संबंधित बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच ते पुन्हा उभे राहिल्याचा आरोप होत असताना नव्याने कारवाई न झाल्यामुळे लोकप्रतिनिधी, नागरिक आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Palghar Flood Relief : पालघरमधील पूरग्रस्तांना मोठा दिलासा! राज्य सरकारकडून विशेष मदतीची घोषणा; बँक खात्यात जमा होणार पैसे

१८ मे रोजी महापालिकेने संबंधित बांधकामावर तोडक कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा उभारण्यात आलेल्या संरचनेवर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन पथक घटनास्थळी पोहोचले, मात्र, गाळ्यात काही साहित्य असल्याचे कारण देत कारवाई न करता पथक परतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ औपचारिकता होती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विविध तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे प्रश्न चर्चेत

वसई-विरारमध्ये बेकायदा बांधकामांचा प्रश्न यापूर्वीही न्यायालये, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे चर्चेत राहिला आहे. ४१ बेकायदा इमारतींच्या प्रकरणात माजी अधिकारी, टाउन प्लॅनिंग विभागातील अधिकारी आणि इतरावर गंभीर आरोप झाले असून, कथित संगनमताची चौकशी विविध स्तरांवर सुरू आहे. सामान्य नागरिकांच्या छोट्या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई केली जाते. मात्र मोठ्या व्यावसायिक बेकायदा बांधकामांबाबत प्रशासनाची भूमिका मवाळ दिसते, त्यामुळे कारवाईच्या निकषांमध्ये समानता आणि पारदर्शकता नसल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे.

स्वतंत्र चौकशी करावी

या पार्श्वभूमीवर संबंधित बांधकामाची दोषी स्वतंत्र चौकशी करून कारवाई का थांबवण्यात आली, याबाबत महापालिका प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अधिकारी किंवा संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरीकांनी केली आहे. या प्रकरणामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पुढील काही दिवसांत महापालिका कोणती भूमिका घेते, याकडे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आ. स्नेहा दुबेंची आक्रमक भूमिका

या प्रकरणात वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी बेकायदेशीर बांधकामांविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतली असून, महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत पालघरच्या पालकमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. यापूर्वीही त्यांनी विधानसभेत वसई-विरारमधील वाढत्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित करून दोषी अधिकारी आणि बांधकामांना संरक्षण देणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. असे असताना महापालिाक प्रशासन मात्र अनधिकृत बांधकामांना अभय देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Vasai News : कचऱ्यात अडकलं शहराचं सौंदर्य, कोट्यवधींच्या शिल्पांची दुरवस्था; देखभालीसाठी पुन्हा 3 कोटींचा खर्च

Web Title: Vasai illegal construction municipal corporation backtrack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • #VasaiNews
  • construction
  • illegal construction
  • Marathi News
  • vasai
  • Vasai news

संबंधित बातम्या

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
1

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
2

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
3

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
4

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.