वसई-विरार शहराला पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेचा 'मास्टर प्लॅन'! ( सौजन्य - सोशल मीडिया )
SIR Voter List: नालासोपारा मतदार यादीतून ३ लाख नावे वगळली? SIR च्या आकडेवारीवरून भाजपवर गंभीर आरोप
गेल्या अनेक वर्षापासून पावसाळ्यात वसई, नालासोपारा आणि विरारमधील सखल भाग पाण्याखाली जाऊन जनजीवन ठप्प होते. २०१८ मध्ये महापालिकेने १२ कोटी रुपये खर्च करून प्राथमिक अभ्यास केला होता. त्या अहवालाच्या आधारे अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात आल्या, मात्र निधीअभावी अनेक प्रकल्प प्रलंबित राहिले. आता या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे.
३० वर्षांचे व्हिजनः वाढत्या नागरीकरणाचा विचार करून पुढील तीन दशकांसाठी पावसाळी पाण्याचा नैसर्गिक व गतिमान निचरा होणारी सक्षम प्रणाली उभारणे.
भरती-ओहोटीचा अभ्यासः समुद्राच्या भरतीचा नाल्यांच्या पाण्याचा उलट प्रवाहावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी अत्याधुनिक गणितीय प्रतिरूपण केले जाईल.
पायाभूत त्रुटींचे मॅपिंगः लिडार तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शहरातील सूक्ष्म भौगोलिक चढ-उतार, अडथळे आणि सभाव्य पूरप्रवण भागांचे अचूक रेखांकन होईल.
तांत्रिक अहवाल येण्यापूर्वीच महापालिकेने तात्पुरत्या दिलाशासाठी स्वखर्चातून अनेक कामे हाती घेतली आहेत. यामध्ये सनसिटी गास रस्ता, आचोळे मुख्य रस्ता, नवघर पूर्व रस्ता, विरार-खारोडी (बोळींज) आणि सेंट्रल पार्क या सखल भागांतील प्रमुख रस्त्यांची उंची टप्याटप्प्याने वाढवण्यात आली आहे. याशिवाय निळेमोरे येथे पावसाचे अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी खासगी विकासकांच्या सहभागातून महत्त्वाचा साठवण तलाव (होल्डिंग पॉण्ड) विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे.
पावसाळ्यात नालासोपारा व विरार दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचून मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वारंवार घडतात, हा अडथळा दूर करण्यासाठी महापालिकेने रेल्वे प्रशासनाकडे २६ कोटी ७१ लाख रुपये सुपूर्द केले होते. या निधीतून नालासोपारा उत्तर बाजू, नालासोपारा-विरार दरम्यान दक्षिण बाजू आणि वसई रोड-नालासोपारा दरम्यान अशा तीन महत्त्वाच्या ठिकाणी भव्य रेल्वे कल्व्हर्टचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यामुळे रुळांखालील पाण्याचा निचरा पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने होण्यास मदत होणार आहे.
समग्र पूरनियंत्रण आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने राज्य शासनाकडे २९५ कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी केली असून, हा प्रकल्प ‘महाराष्ट्र रिझिलन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत जागतिक बँकेच्या मदतीने पूर्णत्वास नेण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत.
Ans: पुण्यातील खडकवासला येथील 'केन्द्रीय जल आणि विद्युत अनुसंधान केंद्रा'मार्फत वसई-विरार शहरात हायटेक लिडार सर्वेक्षण आणि महापूर नकाशांकन केले जात आहे.
Ans: महापालिकेने रेल्वे प्रशासनाला २६ कोटी ७१ लाख रुपये दिले असून, त्या निधीतून नालासोपारा आणि वसई रोड दरम्यान ३ ठिकाणी भव्य रेल्वे कल्व्हर्टचे बांधकाम पूर्ण केले आहे, ज्यामुळे पाण्याचा निचरा दुप्पट वेगाने होईल.
Ans: महापालिकेने राज्य शासनाकडे २९५ कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी केली असून, हा प्रकल्प जागतिक बँकेच्या मदतीने 'महाराष्ट्र रिझिलन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम' अंतर्गत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.






