वैभव सूर्यवंशी खेळणार का? (फोटो- ians)
न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने विजय प्राप्त केला. . या सामन्यात दुखापतग्रस्त इशान किशनच्या जागी अवघ्या १५ वर्षांच्या युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. मात्र यामध्ये तो केवळ 4 रन्स करून आउट झाला. सामन्यानंतर झालेल्या एका विशेष चर्चेत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ मुरली कार्तिक तसेच अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनने वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये मॅनेजमेंटने घेतलेले निर्णय यावर तीव्र आक्षेप घेतला. यामध्ये अजिंक्य राणे आणि अजय जाडेजा देखील सहभागी होते.
काय म्हणाला मुरली कार्तिक?
वैभव सूर्यवंशी हा एक प्रतिभावान आणि युवा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत केवळ ओपनिंगमध्ये फलंदाजी केली आहे. संघात वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू असण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की, गरज भासल्यास त्या अनुभवाच्या आधारावर त्यांनी आपली भूमिका किंवा क्रम बदलावा लागतो. भारत जिंकला ही वेगळी गोष्ट आहे. मात्र जर सूर्यवंशीला तुम्ही खेळवत असाल तर त्याला ओपनिंगला खेळवायला हवे होते.
मुरली कार्तिक म्हणाला, ‘संजू सॅमसनसारखा अनुभवी आणि मुरलेला खेळाडू विविध क्रमांकावर फलंदाजी करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. त्यामुळे मॅनेजमेंट फलंदाजी क्रममध्ये बदल करणे अपेक्षित होते. तर वैभव सूर्यवंशीला ओपनिंगला खेळवायला हवे होते.
उद्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा टी 20 सामना होणार आहे. इशान किशन उद्याचा सामना देखील खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार की कुमार कुशाग्रला दिली जाणार हे पहावे लागणार आहे. वैभव सूर्यवंशी ला खेळण्याची संधी दिल्यास त्याला ओपनिंग खेळायला देणार की पुन्हा त्याच तिसऱ्या नंबरवरच खेळवले जाणार हे पहावे लागणार आहे.
IND vs NZ : टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी सज्ज! भारत-न्यूझीलंड तिसरा T20 सामना कधी अन् कुठे?
Ans: भारत -न्यूझीलंड तिसरा सामना उद्या 12.30 वाजता सुरू होणार आहे..
Ans: इशान किशनला दुखापत झाली असल्याने उद्याच्या सामन्यात वैभवला संधी मिळू शकते






