संग्रहित फोटो
जगत मंदिर परिसरातील हॉस्टेलसमोरील मैदानात शनिवारी रात्री २ गटांमध्ये अज्ञात कारणावरून वाद झाला. काही क्षणांतच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. धारदार शस्त्रांनी अभय याच्यावर प्राणघातक वार करण्यात आले. गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला अभय पाठोडे हा मूळचा घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथील रहिवासी असून, सध्या उमरसरा परिसरात राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्याविरुद्ध यापूर्वी विविध गुन्हे दाखल होते. तसेच महाराष्ट्र धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्यासंबंधीच्या एमपीडीए कायद्यांतर्गत त्याच्यावर दोनदा कारवाई झाली होती. या हत्याकांडामागे पूर्ववैमनस्य होते की अचानक झालेला वाद जीवघेणा ठरला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनास्थळी पोलिसांची धाव; संशयितांचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. हल्ल्यानंतर पसार झालेल्या संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. या संघर्षात नेमके किती जण सहभागी होते, हल्ल्यासाठी कोणत्या शस्त्रांचा वापर करण्यात आला.
एकमेकांकडे पाहिल्याचा राग अन् थेट डोक्यावर वार
एकमेकांकडे पाहण्याच्या क्षुल्लक वादातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना उत्तमनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुशांत विलास ढिले (वय ३२, रा. भवानीमाता कॉम्प्लेक्स, उत्तमनगर) आणि सचिन राजू मारणे (वय २७, रा. अचानक चौक, न्यू कोपरे गाव, उत्तमनगर) अशी आहेत. या प्रकरणी जखमी मुलाने उत्तमनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Ans: यवतमाळ शहरातील जगत मंदिर परिसरातील वसतिगृहासमोरील मैदानात दोन गटांमध्ये झालेल्या वादातून ही घटना घडली.
Ans: अभय ऊर्फ बित्तम पाठोडे याचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर गंभीर जखमी गजानन जाधव याचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Ans: घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पसार झालेल्या संशयितांचा शोध सुरू असून, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.






