• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Palghars Air Base Provides Oxygen To Mumbais People

मुंबईच्या ऑक्सिजनची जबाबदारी पालघर जिल्ह्याने स्वीकारली; आदिवासी शेतकऱ्यांना मिळणार रोजगार

पालघर जिल्ह्यात 'मिशन बांबू' अंतर्गत एक कोटी बांबू लागवडीची सुरुवात करण्यात आली असून, यामुळे पर्यावरण रक्षणासोबत आदिवासी शेतकऱ्यांना रोजगार व उत्पन्न मिळणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 17, 2025 | 03:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दीपक गायकवाड, मोखाडा: वातावरण बदलाचे वाढते संकट लक्षात घेता पालघर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी आता महामुंबईला ऑक्सिजन पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे. एक कोटी बांबू वृक्ष लागवड करण्याच्या ‘मिशन बांबू’ उपक्रमाची सुरुवात पालघर जिल्ह्यात झाली असून, यामुळे पर्यावरण संरक्षणाबरोबरच आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न होणार आहे. १६ मे रोजी सातवली (पालघर) आणि उसगाव (वसई) येथे ‘बांबू मिशन शेतकरी मेळावे’ आयोजित करण्यात आले. यात आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी राज्यस्तरीय आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी सांगितले की, आदिवासींना मिळालेल्या वनपट्ट्यांवर बांबू लागवड करून त्यांना रोजगार, उत्पन्न आणि पर्यावरण रक्षणाची संधी मिळणार आहे.

Bhayander News : भाईंदरमध्ये रस्ता खचला: खाजगी बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना

मुख्यमंत्री पर्यावरण संतुलन कृती दलाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले की, वातावरण बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी जलद गतीने वाढणारा बांबू हा सर्वोत्तम पर्याय आहे. बांबू लागवडीसाठी शासनाकडून ७ लाख ४ हजार रुपयांचे अनुदान मिळणार असून, बांबूपासून २ हजारांहून अधिक वस्तू बनवता येतात.

वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित म्हणाल्या की, पारंपरिक शेती परवडत नाही, त्यामुळे आदिवासींना आता पर्याय म्हणून बांबू लागवड करावी लागेल. यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच रोजगार निर्माण होईल. कॉन्बॅकचे व्यवस्थापकीय संचालक संजीव करपे यांनी सांगितले की, सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीतून यश मिळवले आहे. पालघरमध्ये बांबूची मोठी संधी असून जिल्ह्याने यात आघाडी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

अडीच वर्षांच्या चिमुकलीला सोलापुरातून पळवलं; ‘ती’ पोस्ट व्हायरल होताच मोडनिंबमध्ये आणून सोडलं

मनरेगा अंतर्गत उपजिल्हाधिकारी विजया जाधव यांनी अनुदान प्रक्रियेबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालय, श्रमजीवी संघटना, कृषी, ग्रामविकास, सामाजिक वनीकरण आणि वन विभागाचे अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले. १७ ते १९ मे दरम्यान वाडा, विक्रमगड, डहाणू, तलासरी, मोखाडा आणि जव्हारमध्ये मेळावे होणार असून, बांबू मिशनचा हा उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी नवा टप्पा ठरणार आहे. पालघरच्या वाड्यांमधून आता मुंबईसह संपूर्ण राज्याला हरित श्वास मिळणार आहे.

Web Title: Palghars air base provides oxygen to mumbais people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 03:09 PM

Topics:  

  • Palghar news

संबंधित बातम्या

Palghar Gas Leak: तारापूर एमआयडीसीमध्ये गॅस गळती; एकाच कंपनीतील 4 कामगारांचा मृत्यू, 2 गंभीर
1

Palghar Gas Leak: तारापूर एमआयडीसीमध्ये गॅस गळती; एकाच कंपनीतील 4 कामगारांचा मृत्यू, 2 गंभीर

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
2

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar News : तारपाच्या तालावर आमदार निकोले थिरकले; पालघरमध्ये आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा
3

Palghar News : तारपाच्या तालावर आमदार निकोले थिरकले; पालघरमध्ये आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा

मोखाड्यात कृषीमंत्री कोकाटेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र निषेध
4

मोखाड्यात कृषीमंत्री कोकाटेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र निषेध

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘त्या’ सरकारी वकिलाच्या आत्महत्येप्रकरणी आता थेट न्यायाधीशांवरच गुन्हा दाखल; प्रशासनात एकच खळबळ

‘त्या’ सरकारी वकिलाच्या आत्महत्येप्रकरणी आता थेट न्यायाधीशांवरच गुन्हा दाखल; प्रशासनात एकच खळबळ

Bhadrapada Amavasya 2025: अमावस्येच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, सर्व समस्या होतील दूर 

Bhadrapada Amavasya 2025: अमावस्येच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, सर्व समस्या होतील दूर 

Paryushana Parva 2025 : जैन साधु आणि साध्वी का करतात केशवपन ? या परंपरेमागे आहे एक गुढ रहस्य

Paryushana Parva 2025 : जैन साधु आणि साध्वी का करतात केशवपन ? या परंपरेमागे आहे एक गुढ रहस्य

‘हाफ सीए सीझन 2’चा ट्रेलर प्रदर्शित! CA विद्यार्थ्यांच्या संघर्षमय प्रवास

‘हाफ सीए सीझन 2’चा ट्रेलर प्रदर्शित! CA विद्यार्थ्यांच्या संघर्षमय प्रवास

लैंगिक संबंधादरम्यान गुप्तांगावर हल्ला, लग्नाच्या पहिल्याच रात्री असं काही घडलं की…, पोलिसांसमोर भयानक रहस्य उघड

लैंगिक संबंधादरम्यान गुप्तांगावर हल्ला, लग्नाच्या पहिल्याच रात्री असं काही घडलं की…, पोलिसांसमोर भयानक रहस्य उघड

Devendra Fadnavis: “शासकीय सेवेच्या माध्यमातून…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Devendra Fadnavis: “शासकीय सेवेच्या माध्यमातून…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा

मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा

व्हिडिओ

पुढे बघा
Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.