Palghar Gys Leak (Photo Credit- X)
Palghar Gas Leak: पालघरमधील तारापूर-बोईसर औद्योगिक क्षेत्रातील एका औषध कंपनीत गुरुवारी (21 ऑगस्ट) दुपारी गॅस गळती झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला असून, दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक १३ येथील मेडले फार्मा कंपनीत नायट्रोजन रिॲक्शन टँकमधून गॅसची गळती झाली. या गळतीमुळे एकूण सहा कामगार बाधित झाले. त्यांना तातडीने शिंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, यातील चौघांचा मृत्यू झाला, तर इतर दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले आहे. तर साक्षीदारांचे जबाब घेऊन गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असे पालघर पोलिसांनी सांगितले आहे.
Maharashtra | In the Boisar police station limits of Palghar district, four persons died after suspected suffocation in a pharma factory, Medley Pharma. Six people were found severely affected by the suspected nitrogen leak. They were rushed to the nearest hospital, where four…
— ANI (@ANI) August 21, 2025
Four dead in gas leak at pharmaceutical company in Tarapur-Boisar industrial area in Maharashtra’s Palghar district: officials. pic.twitter.com/UIiLZTz7Hr
— Press Trust of India (@PTI_News) August 21, 2025
या घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव यांचा समावेश आहे. तर, रोहन शिंदे आणि निलेश हाडळ यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला, वायु गळतीचं नेमकं कारण काय आहे? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.
जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे मत
पालघर जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले की, “दुपारी सुमारे 2:30 ते 3 च्या दरम्यान कंपनीतील नायट्रोजन गॅसची गळती झाली. यामुळे तेथे काम करणारे कामगार प्रभावित झाले. सहा कामगारांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे सायंकाळी 6:15 च्या सुमारास चौघांचा मृत्यू झाला. उर्वरित दोघांवर स्थानिक रुग्णालयातील ICU मध्ये उपचार सुरू आहेत. सर्व बाधित कामगारांना कारखान्यातून बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवण्यात आले आहे.”