Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाचगणीचे ‘टेबल लँड’ पडले ओस; खराब रस्त्यांमुळे पर्यटकांनी फिरवली पाठ, स्थानिक व्यावसायिक संकटात!

साताऱ्यातील पाचगणी ठिकाण हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मात्र, येथील टेबल लँड परिसरात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे चित्र दिसून आले आहे. हे नेमके कशामुळे घडले? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 09, 2026 | 10:01 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • पाचगणी परिसरातात पर्यटकांचा शुकशुकाट
  • टेबल लँड परिसरात पर्यटकांची संख्या घटली
  • चला यामागील कारण जाणून घेऊयात
थंड हवेचे ठिकाण म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेल्या पाचगणी येथे पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे पठार म्हणून ओळख असलेल्या टेबल लँड परिसरात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने येथील स्टॉल धारक, घोडे चालक, घोडागाडी चालक तसेच इतर स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या दीड वर्षांपासून महाबळेश्वर–पाचगणी मुख्य रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे पर्यटकांनी या पर्यटनस्थळांकडे पाठ फिरवल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

माहितीनुसार, महाबळेश्वर–पाचगणी मुख्य रस्ता संबंधित ठेकेदाराने खोदून ठेवला असून अद्यापही हा रस्ता पूर्ण करण्यात आलेला नाही. अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला असून खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे प्रवास धोकादायक बनल्याने अनेक पर्यटकांनी पाचगणी आणि महाबळेश्वर येथे येणे टाळले आहे. परिणामी पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

Ahilyanagar News: घुलेवाडी ग्रामपंचायतीवर सतप्त महिलांचा हंडा मोर्चा, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर सुरू करण्याची मागणी

एकेकाळी पर्यटकांनी गजबजलेल्या पाचगणीतील टेबल लँड परिसर, सिडनी पॉइंट आणि पारसी पॉइंट या प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांवर सध्या शांतता पाहायला मिळत आहे. पूर्वी या ठिकाणी सुट्ट्यांच्या काळात तसेच आठवड्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असायची. परंतु आता निसर्गरम्य वातावरण असूनही खराब रस्त्यांमुळे पर्यटक येण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्थानिक व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

टेबल लँड परिसरातील ज्यूस स्टॉल धारक अभिजित पुजारी यांनी सांगितले की, “पूर्वी आमच्या स्टॉलवर दिवसभर पर्यटकांची गर्दी असायची. मात्र आता दिवसातून काही मोजकेच ग्राहक येतात. व्यवसाय जवळपास ठप्प झाला असून रोजच्या खर्चासाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत.”

तसेच घोडागाडी चालक विवेक चव्हाण यांनी सांगितले की, “घोडागाडी हा आमचा मुख्य व्यवसाय आहे. पर्यटक नसल्याने आमचे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले आहे. घोड्यांच्या देखभालीसाठीही खर्च करणे कठीण झाले आहे. प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे आहे.”

Satara: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या ‘दरे’ दौऱ्यावर; खाजगी भेटीत दडलीये राजकीय रणनीती?

पर्यटकांची संख्या घटल्यामुळे स्टॉल धारक, घोडे चालक आणि इतर स्थानिक व्यावसायिकांवर मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हा पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे उत्पन्न बंद झाल्याने अनेकांवर आर्थिक संकट ओढवले असून काहींवर उपासमारीची वेळ आली असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

स्थानिक व्यापारी अनुप कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, “गेल्या दीड वर्षांपासून रस्ता पूर्ण होत नाही. पर्यटक येत नसल्याने आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. प्रशासनाने तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा आमच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहील.”

दरम्यान, स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी जिल्ह्यातील चार ते पाच मंत्र्यांनी या रस्त्याच्या कामाला प्राधान्य देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. तसेच पर्यटन व्यवसाय पुन्हा पूर्ववत सुरू व्हावा आणि स्थानिक व्यावसायिकांना दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
एकूणच, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पाचगणी येथील पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, स्थानिक व्यावसायिकांचे भविष्य आता या रस्त्याच्या कामावरच अवलंबून असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि रस्त्याचे काम कितपत लवकर पूर्ण होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Panchgani tourism hit bad roads table land empty local businesses suffer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 09:59 PM

Topics:  

  • Pachgani
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा
1

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या
2

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या

Satara YC College : सातारा YC कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येने खळबळ; रॅगिंगचा आरोप प्राचार्यांनी फेटाळला
3

Satara YC College : सातारा YC कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येने खळबळ; रॅगिंगचा आरोप प्राचार्यांनी फेटाळला

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!
4

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.