संगमनेर प्रवरा नदीला पाणी नसल्यामुळे घुलेवाडी गाव आणि उपनगरात गेली १५ ते २० दिवसांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या अभावी संतप्त झालेल्या महिलांनी व ग्रामस्थांनी घुलेवाडी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर बसून सुमारे एक ते दीड तास ठिय्या आंदोलन केले आहे. संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी गावासाठी मागील सहा वर्षांत 22 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र प्रत्येक उन्हाळ्यात घुलेवाडी गावात पाणीटंचाई निर्माण होत असते जल जीवन मिशन अंतर्गत या गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी जवळपास १२० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आली आहे. एवढा मोठा निधी खर्च होऊनही गावकऱ्यांना दररोज तर सोडाच, किमान दिवसा आडही पाणी मिळत नसल्याने “हा कोट्यवधींचा निधी गेला कुठे? असा सवाल संतप्त झालेल्या आंदोलनकत्यांनी उपस्थित केला.
Satara: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या ‘दरे’ दौऱ्यावर; खाजगी भेटीत दडलीये राजकीय रणनीती?
वेळेवर पाणी दिले जात नाही परंतु पाणीपट्टी वेळेवर न भरल्यास दंड आकारला जातो, वेळेवर पाणी देण्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष वैशाली राऊत, शिवसेना शाखाप्रमुख शरद पानसरे सिताराम पानसरे, विनायक वाडेकर, स्वरूप राऊत, रोशन कोथिंबीरे, ऋतिक राऊत, नितीन राऊत, नवनाथ राऊत, भैय्या सातपुते यांच्यासह महिलांनी उपस्थित करत तात्काळ पाणी मोठा करण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी केली.
घुलेवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच दत्तात्रय राऊत व ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत क्षीरसागर, रवी गिरी, अनिल राऊत, बाजीराव पानसरे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी यांना संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी चांगलेच धारेवर धरत कोट्यावधी रुपये खर्च करून गावाला पाणी मिळत नसेल तर त्या योजनांचा उपयोग काय असा सवाल उपस्थित करत जलजीवन मिशन योजनेचे काम का थांबले आहे. असा जाब विचारला.
“मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार”; मंत्री नितेश राणेंचे प्रतिपादन
घुलेवाडी गावाला पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ग्रामपंचायतवर मौर्चा येणार असल्याची माहिती देऊनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी वेळेत पोहोचले नाहीत. आंदोलन सुरू होऊन एक ते दीड तास उलटूनही अधिकारी न आल्याने ग्रामस्थांचा पारा जास्त चढला जो पर्यंत जीवन प्राधिकरणचे अधिकारी येत नाही तोपर्यंत है आंदोलन मागे घेणार नाही असा पावित्रा आंदोलन कर्त्यांनी घेतला.
घुलेवाडीतील आदोलनाची माहिती मिळताच संगमनेर पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी राजेंद्र ठाकूर व आणि टंचाई विभाग प्रमुख संजय आरगडे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. चचों करून ग्रामपंचायत प्रशासनाला तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्या बाबत काय उपाययोजना करता येतील याबाबत सूचना दिल्या.






