Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाचगणी भाजी मार्केटला भीषण आग; तब्बल ‘इतक्या’ लाखांचे नुकसान

पाचगणी( ता. महाबळेश्वर )भाजी मार्केटला अचानक भीषण आग लागल्याने भाजी व्यावसायिकांचे सुमारे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ऐन दसऱ्याच्या सणामध्ये या व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 07, 2024 | 01:41 PM
पाचगणी भाजी मार्केटला भीषण आग; तब्बल 'इतक्या' लाखांचे नुकसान

पाचगणी भाजी मार्केटला भीषण आग; तब्बल 'इतक्या' लाखांचे नुकसान

Follow Us
Follow Us:

वाई : पाचगणी( ता. महाबळेश्वर )भाजी मार्केटला अचानक भीषण आग लागल्याने भाजी व्यावसायिकांचे सुमारे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ऐन दसऱ्याच्या सणामध्ये या व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास अचानक पाचगणीच्या भाजी मंडईला आग लागली. आगीचे लोळ व धूर बाजारपेठेत पसरल्याने सर्वजण घटना स्थळी जमा झाले. काहींनी पाण्याच्या साह्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. खाजगी टँकर मागवले त्याने आग विझविण्याचे काम सुरू होते. मात्र आग आणखीनच वाढत होती.

पाचगणी पालिकेच्या बंबाला पाचारण केले परंतु त्यात पाणी नसल्याचे समजल्याने महाबळेश्वर पालिकेशी संपर्क साधला. लागलीच महाबळेश्वर पालिकेचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. काही वेळानी ही आग आटोक्यात आली परंतु या दुकानांतील सर्व भाजी जळून खाक झाली होती.

ही आग कशाने लागली याचा अंदाज नसून, ती शॉर्ट सर्किट ने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये गणेश वाडकर , संजय रजपुरे, अल्ताफ बागवान, अनिता कासूर्डे , भास्कर आंब्राळे, सिद्धेश शिंदे, प्रीती आंब्राळे ,सोहेल बागवान यांच्या भाजीपाला तसेच दुकानांचे सुमारे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले आहे. या व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

२०१५ मध्येही दिवाळी हंगामात फटक्याने अशाच पद्धतीने आग लागली होती. त्यावेळीही अशीच मोठी हानी झाली होती. परंतु त्यावेळी कसलीही नुकसान भरपाई मिळाली नाही. आता दसऱ्याच्या दिवसात अशीच आगीची पुनरावृत्ती झाली आहे. यावेळी तरी या व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. परंतु आता तरी या व्यवसायिकांना न्याय मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: Panchgani vegetable market has suffered huge damage due to the massive fire nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 01:41 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Satara News
  • Satara Police

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती
2

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल
3

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
4

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.