Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीपूर्वी मंदिर परिसरातील कामे पूर्ण करा; जिल्हाधिकाऱ्यांचे संबंधित यंत्रणांना आदेश

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील विविध विकासकामे 25 जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी S Karthikeyan यांनी दिल्या आहेत. भाविकांसाठी स्वच्छ पाणी, आरोग्य सुविधा, भोजन व्यवस्था आणि सुलभ दर्शन यावर भर देत व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णयही कायम ठेवण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 26, 2026 | 06:22 PM
आषाढी वारीपूर्वी मंदिर परिसरातील कामे पूर्ण करा; जिल्हाधिकाऱ्यांचे संबंधित यंत्रणांना आदेश

आषाढी वारीपूर्वी मंदिर परिसरातील कामे पूर्ण करा; जिल्हाधिकाऱ्यांचे संबंधित यंत्रणांना आदेश

Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी केली विविध ठिकाणची पाहणी
  • जिल्ह्यात डिझेल पेट्रोल व गॅस पुरवठा सुरळीत
  • आषाढी वारीपूर्वी मंदिर परिसरातील कामे पूर्ण करा
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत पडसाळ, देणगी कक्ष, अर्ध मंडप येथील पायऱ्या ही कामे 25 जून पर्यंत पूर्ण करावीत. तसेच पश्चिमद्वार चे काम तात्काळ सुरू करून आषाढी वारी पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी दिल्या.आज जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी रिद्धी सिद्धी दर्शन मंडप, चंद्रभागा वाळवंट, सीसीटीव्ही कंट्रोल रूम, वाखरी पालखीतळ तसेच वाखरी ते पंढरपूर महामार्गाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी त्यांच्या समवेत सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटी, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन म्हणाले, अधिक मासातील एकादशीनिमित्त मंदिर समिती मार्फत दर्शन रांगेत भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, विश्रांती कक्ष, भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा, शौचालय, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दर्शन रांगेतील भाविकांचे जलद व सुलभ दर्शन व्हावे यासाठी व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. दर्शन रांगेत घुसखोरी करणारे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी प्रांताधिकारी यांनी दररोज सीसीटीव्हीची पाहणी करावी व यामध्ये दोषी आढळल्यास तात्काळ कारवाई करावी. दर्शन रांग व मंदिर परिसरात आरोग्य सुविधा केंद्र वाढविण्यात येणार.सद्यस्थितीत दर्शनी मंडपाचे काम सुरू असून आषाढी वारीत पावसामुळे चिखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“पंतप्रधान मोदींनी भारताला जागतिक महासत्तेकडे…” ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ प्रकाशनावेळी काय म्हणाले रवींद्र चव्हाण?

सोलापूर जिल्ह्यात डिझेल पेट्रोल व गॅसची टंचाई नसून, पुरवठा सुरळीत सुरू आहे. आषाढी वारी कालावधीत देखील टंचाई निर्माण होणार नाही दक्षता घेण्यात आली आहे.आषाढी यात्रा कालावधीत पालखी मार्गावर ज्यादा जर्मनी हँगरची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. भाविकांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी टू व्हीलर ॲम्बुलन्सची संख्या वाढविण्यात येणार आहे. दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये याची दक्षता घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. शहरातील अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावीत. तसेच अतिक्रमण होणार नाही याबाबत कायमस्वरूपी नियोजन करण्यात यावे. मंदिर परिसरात फिरत्या विक्रेत्यांचा भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने सदर विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करावी.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाखरी ते पंढरपूर रस्त्याचे काम सुरू असून वारी अगोदर साईड पट्टी स्वच्छ करण्याचे तसेच दोन्ही पुलावरील मुरमीकरण व सपाटीकरण 25 जून पर्यंत पूर्ण करावे. नगरपालिकेने नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करावेत. खाद्यपदार्थांच्या दुकानाची वेळोवेळी तपासण्या करण्यासाठी अन्न औषध प्रशासनाकडून ज्यादा पथके नेमण्यात येणार आहेत. चंद्रभागा नदी पात्रातील होडी चालकांना भाविकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी लाइफ जॅकेट देण्यात येणार आहेत. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी कोणत्याही भाविकांनी पैसे देऊ नयेत. दर्शन निशुल्क असल्याबाबतचे फलक दर्शनी भागात लावावेत. अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी दिल्या.

अधिकमासातील कमला एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी चार ते पाच लाख वारकरी भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समिती मार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा बाबतची जिल्हाधिकारी यांनी माहिती घेतली. वेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी अधिक मासानिमित्त वारकरी भाविकांच्या सोयी सुविधेसाठी दर्शन रांग दर्शन मंडप येथे करण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली तसेच मंदिर जतन व संवर्धन आराखड्याअंतर्गत पूर्ण झालेल्या व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली.

Gokul Sugar factory: रस्त्यावर पेटली चूल, डाळ-भात शिजवून ठिय्या; ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक

Web Title: Pandharpur ashadhi wari preparation viththal rukmini temple conservation work district collector instructions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • maharashtra
  • pandharpur

संबंधित बातम्या

अमृता खानविलकरला ‘नटरंग’ कलागौरव पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण
1

अमृता खानविलकरला ‘नटरंग’ कलागौरव पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण

चारा-पाण्याविना हंबरडा; म्हसवडमध्ये जर्शी बछड्यांची दयनीय अवस्था, वनविभागाकडे मदतीची मागणी
2

चारा-पाण्याविना हंबरडा; म्हसवडमध्ये जर्शी बछड्यांची दयनीय अवस्था, वनविभागाकडे मदतीची मागणी

Pratap Sarnaik: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी शिक्षण मोहीम; प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा
3

Pratap Sarnaik: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी शिक्षण मोहीम; प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

इंधन संकटावर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा; “पेट्रोल-डिझेलची साठेबाजी खपवून घेणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका!”
4

इंधन संकटावर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा; “पेट्रोल-डिझेलची साठेबाजी खपवून घेणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका!”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.