Gokul Sugar factory: रस्त्यावर पेटली चूल, डाळ-भात शिजवून ठिय्या; ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक
शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने कारखान्यावर जप्तीचे आदेश काढले आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जोपर्यंत रक्कम जमा होणार नाही, तोपर्यंत शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयापासून आणणार नाही, अशी माहिती यावेळी आंदोलन शेतकरी अमोल पाटील यांनी दिली. यावेळी अरविंद घोडके अंबादास शिवशंकर सचिन जवळगे प्रशांत सुरवसे गणेश नरे आधी सह तीस गावातील शेतकरी उपस्थित होते.
Eknath Shinde Amit Shah meeting: अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेटीमागचे नेमके कारण काय?
जोपर्यंत शेतकऱ्यांना थकीत ऊस बिल मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. गेल्या दोन दिवसापासून आंदोलनाचे ठिकाणीच चूल पेटवून शेतकऱ्यांनी डाळ भात खाऊन दिवस काढण्यास सुरुवात केली आहे.
सोलापूरमधील (धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) गोकुळ शुगर इंडस्ट्रिज लिमिटेड या खासगी कारखान्याने शेतकऱ्यांचे तब्बल १३० कोटी ४६ लाख रुपये (एफआरपी) थकवले आहेत. याप्रकरणी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी कारखान्याची साखर, मोलॅसिस आणि बगॅस जप्त करून विक्रीद्वारे रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
ऊस गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी थकीत ठेवल्याप्रकरणी गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिडेट या खासगी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी या जप्तीचे दिले आहे.
कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या एफआरपीची तब्बल १३० कोटी ४६ लाख २५ हजार रुपयांची थकबाकी राहिली आहे. या थकीत रकमेसोबतच १५ टक्के दराने आकारण्यात येणारे व्याजही वसूल करण्याचे आदेश आयुक्त कोलते यांच्याकडून देण्यात आले.
ऊस (नियंत्रण) आदेशातील तरतुदीनुसार, गाळप करण्यात आलेल्या उसाची एफआरपी संबंधित शेतकऱ्यांना १४ दिवसांच्या आत देणे प्रत्येक साखर कारखान्यावर बंधनकारक आहे. पण या मुदतीनंतरही एफआरपीची रक्कम थकीत राहिल्यास विलंब कालावधीसाठी १५ टक्के व्याज आकारण्याची स्पष्ट तरतूद आहे.
असे असतानाही गोकुळ शुगर इंडस्ट्रीजने एफआरपीची मोठी रक्कम थकीत ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने हंगाम २०२५-२६ मधील गाळप, ढोबळ एफआरपी, ऊसतोडणी आणि वाहतूक खर्चाबाबत माहिती मागवूनही कारखान्याकडून आवश्यक माहिती सादर करण्यात आलेली नाही.






