पंढरपूर : कर्नाटकातील विठ्ठल रुक्मिणी (Shri Vitthal Rukmini Mandir) यांच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात विठ्ठल भक्त (Vitthal Bhakt) येतात. यासाठी बऱ्याच दिवसांच्या मागणीला यश आले आहे. आज मध्य रेल्वेने म्हैसूर-पंढरपूर व पंढरपूर-म्हैसूर रेल्वेगाडी सुरू करण्यात केली आहे. म्हैसूर येथून पंढरपुरात आलेल्या पहिल्या रेल्वेचे स्वागत आमदार समाधान आवताडे यांनी केले.
मध्य रेल्वेने म्हैसूर-पंढरपूर व पंढरपूर म्हैसूर अशी ‘गोल घुमट एक्सप्रेस’ रेल्वे गाडी सुरू केले आहे. यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांची सोय होणार आहे. ही रेल्वे गाडी सोमवारी (दि.४) म्हैसूर येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. ती मंगळवारी (दि.५) दुपारी २ वाजता पंढरपूर रेल्वे स्थानकात आली. या रेल्वेचे स्वागत आमदार आवताडे यांनी केले. यानंतर रेल्वे पुन्हा पंढरपूरहून म्हैसूरकडे मार्गस्थ झाली. ही रेल्वे गाडी दररोज म्हैसूर येथून पंढरपूर व पंढरपूर येथून मैसूरकडे धावणार आहे.
पंढरपूर येथे म्हैसूर-पंढरपूर रेल्वेचे स्वागत करताना युवा नेते प्रणव परिचारक, जितेंद्र बनसोडे, संतोष पवार, दीपक पवार, सुरेश लाड, शशिकांत हरिदास, काशिनाथ थिटे, प्रा.डॉ. चांगदेव कांबळे,सुनील डोंबे, दिपक येळे, राजेंद्र बेऊर आदी मान्यवर मंडळी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.