Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरपूरचा कायापालट होणार! ४१५० कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता; ३० महिन्यांत काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Pandharpur Development Plan: पंढरपूरच्या विकासासाठी ४१५०.४६ कोटींच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. मंदिर कॉरिडॉर आणि भाविकांच्या सुविधांसाठी ३० महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 04, 2026 | 09:16 PM
पंढरपूरचा कायापालट होणार! ४१५० कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता (Photo Credit- X)

पंढरपूरचा कायापालट होणार! ४१५० कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • पंढरपूरचा कायापालट होणार!
  • ४१५० कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता
  • ३० महिन्यांत काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
पंढरपूर, (वा.): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीथक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत ४१५०.४६ कोटीच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता देण्यात आली. पंढरपूर हे राज्यातील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकास आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात. पुढील ५० वर्षाचा विचार करुन या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामे येत्या ३० महिन्यात पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक, ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. समाधान अवताडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वारकरी व भाविकांना स्वच्छ, गर्दीमुक्त, सुरक्षित आणि आध्यात्मिकदृष्ट्या समाधानकारक अनुभव मिळावा हा विचार करून विकास कामे दर्जेदार, शाश्वत व भविष्याभिमुख पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. यासाठी बाधित निवासी व व्यावसायिक मालमत्ताधारक तसेच भाडेकरूंना योग्य मोबदला तात्काळ देण्यात यावा. भूसंपादनासाठी आवश्यक निधीही त्वरित उपलब्ध करून द्यावा आणि निधीअभावी कोणतेही काम अपूर्ण राहू नये, अशा सूचनाही मुख्यमंत्री यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी Mercedes G63 चालवत केलं मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं उद्घाटन; जाणून घ्या SUV चे दमदार फीचर्स

सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बैठकीत सादर केलेल्या प्रस्तावानुसार गर्दी व्यवस्थापनासाठी कॉरिडॉर उभारणी, पुरातन मंदिर व मठांचे जतन-संवर्धन, बाधितांना व्यावसायिक संधी आणि वारकऱ्यांसाठी समग्र सुविधा विकास यासाठी ७३५.८० कोटी रुपयांचा आराखडा मांडण्यात आला. तसेच नगर प्रदक्षिणा मार्ग विकास, नदी घाट सुशोभीकरण, वाहनतळ व व्यापारी संकुल, शहर सुशोभीकरण, रस्ते व पूल आणि पालखी तळांच्या विकासासाठी १३८७.९१ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याशिवाय भूसंपादन व पुनर्वसन खर्च, बाधित इमारतींचा मोबदला आदींसाठी २०२६.७५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला. असा एकूण ४१५०.४६ कोटी रुपयांच्या या सर्वसमावेशक आराखड्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी आजच्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता दिली.

मुख्यमंत्र्यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’

महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विकास आराखड्यांतर्गत भूसंपादनाची प्रक्रिया १ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. मागील आषाढी एकादशीला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुमारे २८ लाख भाविक पंढरपुरात दाखल झाल्याची नोंद झाली होती. त्यामुळे भाविकांना अधिक सुरक्षित व सहज दर्शन घेता यावे, यासाठी या कॉरिडॉरची आखणी करण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांच्या आक्षेपांवर उपाय

या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्थानिक व्यापाऱ्यांकडून काहीसा विरोध दर्शवण्यात आला होता. कॉरिडॉरमुळे दुकानांचे स्थलांतर करावे लागेल, अशी भीती व्यापाऱ्यांमध्ये होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सोलापूर दौऱ्यात व्यापाऱ्यांशी संवाद साधत, या प्रकल्पामुळे त्यांचा व्यवसाय अनेक पटींनी वाढेल, असा विश्वास दिला होता. त्यानंतर प्रशासनानेही व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढल्याने प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी सरकारचा पुढाकार; कॅबिनेटमध्ये मार्गदर्शक पुस्तिकेचे अनावरण

Web Title: Pandharpur pilgrimage development plan 4150 crore approved cm fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra
  • pandharpur

संबंधित बातम्या

Satara Politics: सातारा पालिकेत सत्ताधाऱ्यांचाच रणसंग्राम! बनकर-खंदारे वादाने सभागृह तापले, दोन तासांच्या गदारोळात 15 विषय मंजूर
1

Satara Politics: सातारा पालिकेत सत्ताधाऱ्यांचाच रणसंग्राम! बनकर-खंदारे वादाने सभागृह तापले, दोन तासांच्या गदारोळात 15 विषय मंजूर

Water Crisis : माण-खटावमध्ये शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा, ४१ अंश तापमानातही शेतकरी रस्त्यावर
2

Water Crisis : माण-खटावमध्ये शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा, ४१ अंश तापमानातही शेतकरी रस्त्यावर

Matheran News : माथेरानच्या जंगलात अनधिकृत खोदकाम? वन विभागाची टोलवाटोलवी की ठेकेदाराला पाठीशी? आदिवासींचा संताप
3

Matheran News : माथेरानच्या जंगलात अनधिकृत खोदकाम? वन विभागाची टोलवाटोलवी की ठेकेदाराला पाठीशी? आदिवासींचा संताप

Nashik News : तब्बल 15000 कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सराफ व्यावसायिकांत चिंता
4

Nashik News : तब्बल 15000 कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सराफ व्यावसायिकांत चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.