Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुदत संपली तरी खुर्ची कायम, विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे श्रीकांत शिंदे यांची मागणी

पाच वर्षांचा कार्यकाळ संपूनही श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती अद्याप कार्यरत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे समिती तात्काळ बरखास्त करून नवीन समिती नियुक्त करण्याची मागणी केली आहे. आषाढी यात्रेपूर्वी हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 03, 2026 | 09:06 PM
'मुदत संपली तरी खुर्ची कायम, विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे श्रीकांत शिंदे यांची मागणी

'मुदत संपली तरी खुर्ची कायम, विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे श्रीकांत शिंदे यांची मागणी

Follow Us
Follow Us:

पंढरपूर | शिवाजी हळणवर : आषाढी यात्रेच्या तोंडावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वैधतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘पाच वर्षांसाठी स्थापन झालेली समिती आता दहाव्या वर्षात कशी? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान मंदिर समिती तात्काळ बरखास्त करून नवीन समिती नियुक्त करण्याची मागणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३ जुलै २०१७ रोजी स्थापन झालेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा पाच वर्षांचा कार्यकाळ जुलै २०२२ मध्येच संपुष्टात आला. मात्र मुदत संपून चार वर्षे उलटल्यानंतरही समिती कार्यरत असून ती आता दहाव्या वर्षाकडे वाटचाल करत आहे. राज्यात अनेक राजकीय बदल झाले, चार मुख्यमंत्री बदलले, मात्र मंदिर समिती मात्र अद्याप कायम असल्याने भाविक आणि पंढरपूरकरांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Ambenali Ghat Closed: अखेर आंबेनली घाट संपूर्ण वाहनांसाठी आज पासून चार दिवस बंद, पर्याय मार्ग वापरण्याचे आवाहन

शिंदे यांनी निवेदनात असा आरोप केला आहे की, मंदिर समितीकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविण्यात येणाऱ्या माहितीसंदर्भात अनेकदा अपुरी, चुकीची व दिशाभूल करणारी उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे समितीच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.तसेच, मंदिर शासनाच्या ताब्यात येऊन तेरा वर्षांहून अधिक कालावधी उलटला असून पंढरपूरच्या विकासाला गती मिळत असताना मंदिर समितीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. महायुती सरकारने नव्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना तसेच वारकरी संप्रदायातील प्रतिनिधींना समितीत संधी द्यावी. यापूर्वी समितीवर राहिलेल्या सदस्यांना पुन्हा संधी देऊ नये, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की, तत्कालीन अध्यक्ष आ. अतुल भोसले यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद अद्याप रिक्त आहे. अनेक सदस्य नियमित बैठकींना उपस्थित राहत नसून केवळ ऑनलाइन बैठकीत सहभाग नोंदवितात. त्यामुळे समितीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंदिराच्या कारभारावर मोजक्या सदस्यांची मक्तेदारी निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

आषाढी यात्रेपूर्वीच विद्यमान समिती बरखास्त करून नवीन कार्यकारिणीची नियुक्ती करावी, अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. या मागणीमुळे आषाढीपूर्वी मंदिर समितीच्या पुनर्रचनेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

‘ॲट्रॉसिटी’ कायद्यात दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस व सरकारी वकिलांना निर्देश

उपमुख्यमंत्री सुनेञा पवार यांचा आषाढीपूर्वीच दौरा… मंदिर समितीवर निर्णयाचे संकेत?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या (४ जुलै) पंढरपूर दौऱ्यावर येऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार असून नव्या धर्मशाळा-भक्तनिवास इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.

दरम्यान, पाच वर्षांचा कार्यकाळ संपूनही सध्याची मंदिर समिती दहाव्या वर्षाकडे वाटचाल करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे या दौऱ्यात समिती बरखास्ती किंवा नव्या समिती नियुक्तीबाबत काही संकेत मिळतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तर आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात येणार असल्याने नवीन मंदिर समिती नियुक्तीची घोषणा होणार का? याबाबत राजकीय वर्तुळासह भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: Pandharpur vitthal temple committee dismissal demand srikant shinde letter to sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 09:06 PM

Topics:  

  • pandharpur
  • Pandharpur Vitthal Rukmini Temple
  • Sunetra Pawar
  • vitthal mandir

संबंधित बातम्या

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!
1

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!

Wardha News : सिंचनासाठी २४ तास वीजपुरवठ्याची मागणी, माजी आमदार तिमांडे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना साकडे
2

Wardha News : सिंचनासाठी २४ तास वीजपुरवठ्याची मागणी, माजी आमदार तिमांडे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना साकडे

Lagna Ani Barach Kahi: ‘लग्न आणि बरंच काही’चा नवा अंदाज; सुनेत्रा पवारांच्या हस्ते पोस्टर अनावरण
3

Lagna Ani Barach Kahi: ‘लग्न आणि बरंच काही’चा नवा अंदाज; सुनेत्रा पवारांच्या हस्ते पोस्टर अनावरण

श्रीविठ्ठलाला विठोबा, पांडुरंग आणि विठूमाऊली का म्हणतात? जाणून घ्या लोकप्रिय नावांमागचा अर्थ
4

श्रीविठ्ठलाला विठोबा, पांडुरंग आणि विठूमाऊली का म्हणतात? जाणून घ्या लोकप्रिय नावांमागचा अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.