सकाळी थरार...! मराठवाड्यातील 'या' तीन जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोलीजवळ जमिनीखाली १० किलोमीटरवर होता. ही घटना सकाळी ठीक ८:४५ वाजता घडली. भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की त्याचे धक्के केवळ हिंगोलीमध्येच नव्हे, तर नांदेड, परभणी, वाशिम आणि यवतमाळ यांसारख्या शेजारच्या जिल्ह्यांमध्येही स्पष्टपणे जाणवले.
पहिला धक्का हिंगोली जिल्ह्यात सकाळी ८:४५ वाजता बसला आणि एका मिनिटानंतर म्हणजेच ८:४६ वाजता परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाची जाणीव झाली. सकाळी कामात व्यत्यय आल्याने अचानक घरातील खिडक्या आणि भांडी वाजू लागली आणि नागरिकांना भूकंपाची जाणीव झाली. विशेषतः वासमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात, गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे सत्र सुरू असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घबराट पसरली आहे.
भूकंप होताच, घाबरलेले नागरिक आपापल्या घरातून आणि इमारतींमधून बाहेर मोकळ्या मैदानात पळाले. हिंगोली आणि नांदेड जिल्हा प्रशासनाने तात्काळ परिस्थितीची दखल घेतली. प्राथमिक अहवालानुसार, कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. नागरिकांना घाबरून न जाता शांत आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही. मात्र वारंवार होणाऱ्या स्थलांतरामुळे किंवा विस्थापनामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्हा प्रशासन परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांना घाबरून न जाण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, जमिनीच्या पृष्ठभागाजवळ होणारे भूकंप अधिक धोकादायक मानले जातात, कारण त्यातून ऊर्जा वेगाने बाहेर पडते आणि जास्त कंपने निर्माण होतात. खोल भागातील भूकंपांपेक्षा उथळ भागातील भूकंपांचा प्रभाव अधिक असू शकतो. भूकंपाचे धक्के जाणवल्यास, तात्काळ घर सोडून मोकळ्या जागेत जा. बाहेर पडणे शक्य नसल्यास, मजबूत टेबल किंवा पलंगाखाली लपा आणि खिडक्या व काचेच्या वस्तूंपासून दूर राहा.






