Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: कीटकनाशकाची फवारणी बेततेय जीवावर! फवारणीतून ५१ जणांना विषबाधा, कीटकनाशके वापरतांना काळजी घ्या

शेतामध्ये चुकीच्या पद्धतीने कीटनाशकांची फवारणी केल्यामुळे अनेकांना विषबाधा झाल्याचे दिसून आले आहे. शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी करताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्यास गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 02, 2026 | 11:20 AM
कीटकनाशकाची फवारणी बेततेय जीवावर! फवारणीतून ५१ जणांना विषबाधा, कीटकनाशके वापरतांना काळजी घ्या

कीटकनाशकाची फवारणी बेततेय जीवावर! फवारणीतून ५१ जणांना विषबाधा, कीटकनाशके वापरतांना काळजी घ्या

Follow Us
Follow Us:

चुकीच्या पध्दतीने फवारणी करणे यासह तंबाखू, गुटखा याचे सेवन यामुळे मध्यंतरीच्या काळात अनेकांना विषबाधा झाली होती. २०१७मध्ये तर हा मुद्दा देशपातळीवर गाजला होता. तुर्तास जिल्ह्यात शेतात कीटकनाशक फवारणी करताना ५१ जणांना विषबाधा झाली. दरम्यान विषबाधा झालेल्या एकाही व्यक्तीची नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी करताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा वापर करताना विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.(फोटो सौजन्य – AI)

पांढऱ्या किडीचा प्रादुर्भावाने ऊसपीक धोक्यात! वाढ खुंटल्याने पाने पिवळी; उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती

ढगाळी वातावरणामुळे सध्या सोयाबीन कपाशी पिकांवर मावा, तुडतुडे पांढरी माशी यासह विविध रोगाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी किटकनाशकाची फवारणी करणे सुरू आहे. मात्र फवारणी करतांना अनेक शेतकरी, शेतमजुर सुरक्षीत साहित्याचा वापर करतांना दिसत नाही. अनेकदा तर दुषीत हातानेच तंबाखू, खर्रा व तत्सम पदार्थ चळघळतात. घातक किटकनाशकाची फवारणी करताना सुरक्षा किट, हातमोजे, नाकाला मास्क लावणे आवश्यक असते. मात्र शेतकरी, शेतमजूर अशा साधनांकडे सर्रास दुर्लक्ष करतो. त्यामुळे यातून अनेकांना विषबाधा होते. जिल्ह्यात २०२६ मध्ये विषबाधेची एकूण ५१ प्रकरणे नोंदविण्यात आली असून, यापैकी कीटकनाशक फवारणीच्या संपर्कामुळे एकही व्यक्ती बाधित अथवा मृत झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान कृषी व पोलिस विभागाच्या शासन परिपत्रकानुसार तसेच कीटकनाशक अधिनियम, १९६८ मधील कलम २६ अंतर्गत जिल्ह्यातील विषबाधा आणि मृत्यूच्या घटनांची माहिती संकलित करण्यात आली आहे. हा अहवाल कृषी विभागाच्या मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात फवारणीच्या संपर्कामुळे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. यावर्षी ऑगस्टपर्यंत ५१ जणांचा किटकनाशक फवारणी दरम्यान विषबाधा झाली होती.

जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीदरम्यान शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याची समस्या नवीन नाही. यवतमाळ जिल्ह्यात २०१७ मध्ये सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर विषबाधेच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनेत ४५० च्या वर शेतकरी व शेतमजूरांना फवारणी करतांना बाधा होवून यात तब्बल २३ जणांचा मृत्यू झाला होता. ही बाब प्रचार माध्यमांनी लावून धरल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि पालकमंत्री यांनी बाधितांची भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केली होती. प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

आदिवासींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन! समाजाच्या विविध मागण्या; आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित

२०२० मध्ये पुन्हा २२ शेतकरी व शेतमजुरांना फवारणी दरम्यान विषबाधा झाली होती. मात्र यावेळी कोणतीही जिवीतहाणी झाली नाही. त्यानंतर २०२५ मध्ये पांढरकवडा तालुक्यात एकाला विषबाधा झाली होती. दरम्यान या घटनानंतर कृषी विभाग जागा झाला. त्यांनी विविध माध्यमांतून शेतकरी, शेतमजुरासाठी फवारणीसंदर्भात विविध मेळावे, शिबीर आयोजित करण्यात आले. यासह फवारणींचे संरक्षण किट सुध्दा उपलब्ध करून देण्यात आले होते.८८ जिल्ह्यात आतापर्यंत ५१ शेतकऱ्यांना फवारणी करताना विषबाधा झालेली आहे. या सर्व शेतकऱ्यांवर येथील रूग्णालयात उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली. शेतकऱ्यांनी तसेच शेतमजुरांनी फवारणी करतांना काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांना अशा समस्येपासून स्वतःला वाचविता येईल.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Pesticide spraying proving fatal 51 people poisoned during spraying exercise caution when using pesticides

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Agricultural Crops
  • Farmer Issue
  • Yavatmal

संबंधित बातम्या

पांढऱ्या किडीचा प्रादुर्भावाने ऊसपीक धोक्यात! वाढ खुंटल्याने पाने पिवळी; उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती
1

पांढऱ्या किडीचा प्रादुर्भावाने ऊसपीक धोक्यात! वाढ खुंटल्याने पाने पिवळी; उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती

Yavatmal News: दर्जेदार बियाण्यांसाठी राष्ट्रीय संस्थांशी करार! आता हवामानानुकूल व अधिक उत्पादनक्षम वाण उपलब्ध होणार
2

Yavatmal News: दर्जेदार बियाण्यांसाठी राष्ट्रीय संस्थांशी करार! आता हवामानानुकूल व अधिक उत्पादनक्षम वाण उपलब्ध होणार

आदिवासींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन! समाजाच्या विविध मागण्या; आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित
3

आदिवासींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन! समाजाच्या विविध मागण्या; आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.