प्रतीकात्मक फोटो
फलटण : शहरातील वाढती रुग्ण संख्या आणि डेंग्यूने झालेल्या २ मृतांची नोंद घेऊन नगर परिषदेने मृताच्या नातेवाइकांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, मंगळवार पेठेतील मृत तरुणाच्या आईला नोकरीत सामावून घेण्याची मागणी करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने नगरपरिषदेवर धडक माेर्चा काढला. प्रशासन साथीच्या आजाराकडे गांभीर्याने पहात नसल्याचा आरोप करीत तीव्र निषेध समितीने केला.
फलटण शहरात डेंग्यू आजाराने थैमान घातले असून डेंग्यूने युवकाचा बळी घेतल्यामुळे शहरातील डेंग्यू मृतांची संख्या २ झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मंगळवार पेठ भागातील नागरिकांनी नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना दिले आहे.
मंगळवार पेठ, फलटण येथील किरण राजू काकडे (वय २२) यास डेंग्यू आजाराची लागण झाली होती, त्याच्यावर फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना किरणची प्रकृती गंभीर झाल्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला पुणे येथे पाठविण्यात आले. काकडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मंगळवार पेठेतील नागरिकांनी लोकवर्गणी काढून वैद्यकिय उपचारासाठी पैसे जमा केले व किरणच्या उपचारासाठी पुण्यास पाठविले, परंतू उपचारात यश आले नाही. दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी पुणे येथे उपचारा दरम्यान किरणचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
मृत्यूस नगरपालिका जबाबदार
किरण काकडेच्या मृत्यूस नगरपालिका जबाबदार आहे. किरण काकडे याच्या घराच्या अवती भवती अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून वेळेत उपाय योजना केल्या असत्या तर या युवकाचा जीव वाचला असता असा अाराेप करीत अांदाेलकांनी नगरपालिका प्रशासनाचा िनषेध केला.
[blockquote content=”युवकाच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत मिळविण्याबाबत आपण सकारात्मक प्रयत्न करु, मृत युवकाच्या आईस रोजगार मिळावा या संदर्भात आपण काही ना काही मार्ग काढून त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करु. ” pic=”” name=”-संजय गायकवाड, मुख्याधिकारी “]