Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC Toxic Liquor Case: दारूत मिसळलेला ‘तो’ एक रासायनिक पदार्थ…; ज्याने घेतले 8 जणांचे बळी

Pimpri Chinchwad spurious liquor tragedy : उत्पादन शुल्क विभागाच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हातभट्टीच्या दारूमध्ये केमिकल युक्त 'मिथेनॉल' मिसळणारे एक मोठे रॅकेट पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सक्रिय आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 29, 2026 | 05:29 PM
PCMC Toxic Liquor Case: दारूत मिसळलेला ‘तो’ एक रासायनिक पदार्थ…; ज्याने घेतले 8 जणांचे बळी
Follow Us
Follow Us:
  • फुगेवाडी आणि दापोडी परिसरात गेल्या ४८ तासांत झालेल्या 8 जणांच्या मृत्यू
  • एकाच फलकावर जेव्हा गावातील सात ते आठ नागरिकांच्या निधनाची माहितीने खळबळ
  • हातभट्टीच्या दारूमध्ये केमिकल युक्त ‘मिथेनॉल’ मिसळणारे एक मोठे रॅकेट
Pimpri-Chinchwad Toxic Liquor Case: औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी आणि दापोडी परिसरात गेल्या ४८ तासांत झालेल्या 8 जणांच्या मृत्यूने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला प्रशासनाकडून लपवाछपवी करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी अखेर पोलिसांनी आणि उत्पादन शुल्क विभागाने या मृत्यूंमागे अवैध ‘मिथेनॉल’ (विषारी रासायनिक पदार्थ) चे कनेक्शन असल्याचे अधिकृतपणे मान्य केले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा अनर्थ घडल्याचा आरोप होत असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने कारवाई करत या रॅकेटचा मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे याला बेड्या ठोकल्या आहेत.

आझाद चौकातील ‘त्या’ फलकाने उघड केले मृत्यूचे तांडव:

गुरुवारी (२८ मे) फुगेवाडी गावातील आझाद चौकात एक शोककुळाचा फलक लावण्यात आला होता. या एकाच फलकावर जेव्हा गावातील सात ते आठ नागरिकांच्या निधनाची माहिती एकत्रितपणे प्रसिद्ध झाली, तेव्हा संपूर्ण परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले.सुरुवातीला दापोडी पोलिसांनी हे मृत्यू वेगवेगळ्या आणि नैसर्गिक कारणांमुळे (हृदयविकार, चक्कर येऊन पडणे) झाल्याचा दावा केला होता. मात्र, स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी अवैध हातभट्टीच्या दारूमुळेच हे बळी गेल्याचा उघड आरोप केला. अखेर वाढता संताप आणि प्राथमिक तपासानंतर, पोलिसांनी सातपैकी चार जणांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्यानेच झाल्याचे स्पष्ट केले.

विषारी दारूमुळे १८ मृत्यू, राजकीय वातावरण पेटले; काँग्रेसकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी!

मृतांची आणि बाधितांची सद्यस्थिती

या भीषण घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी निष्पन्न झालेल्या प्रमुख मृतांची नावे खालीलप्रमाणे आहेत:पांडुरंग सदाशिव फुगे (वय ५७)विजय प्रकाश राठोड (वय ३१)राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४)राजेंद्र राजपूत (वय ५१)अकबर पठाण (वय ५२)आनंद पांडुरंग देसाई (वय ६०)आनंद काशीनाथ निकाळजे (वय ७०)
अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज: या घटनेमुळे सुभाष डिगीकर आणि अक्षय अवसरमल यांच्यासह इतर रुग्णांवर जवळच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

मिथेनॉल पुरवठ्याचे मोठे रॅकेट; आठ जण अटकेत

उत्पादन शुल्क विभागाच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हातभट्टीच्या दारूमध्ये केमिकल युक्त ‘मिथेनॉल’ मिसळणारे एक मोठे रॅकेट पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सक्रिय आहे. मिथेनॉल पुरवठ्यावर एफडीएचे कोणतेही नियंत्रण नसल्याने हा जीवघेणा काळाबाजार सुरू होता. उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला दापोडी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.

वानखेडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, शहरात ज्या ज्या ठिकाणी स्पिरिट आणि दारूचे कॅन पुरवले होते, त्या सर्व केंद्रांची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आकाश जाधव याच्यासह इतर आरोपींना ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली असून, ५ जण पोलिसांच्या तर ३ जण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात आहेत.

पुणे विषारी दारू प्रकरणात १८ जण दगावले ! रोहित पवार घटनास्थळी दाखल.. कार्यकर्त्यांनी फोडलं दारूचं दुकान !

मिथेनॉल म्हणजे काय? दारूमधील भेसळीमुळे होणारे जीवघेणे परिणाम

मिथेनॉल हे अत्यंत विषारी औद्योगिक अल्कोहोल असून त्याचा वापर प्रामुख्याने सॉल्व्हेंट, इंधन आणि विविध रसायने तयार करण्यासाठी केला जातो. याला ‘मिथाइल अल्कोहोल’ असेही म्हटले जाते. काही वेळा बेकायदेशीररीत्या दारूमध्ये भेसळ करण्यासाठी मिथेनॉल मिसळले जाते. अशा प्रकारची दारू सेवन केल्यास शरीरात मिथेनॉलचे रूपांतर ‘फॉर्मिक ॲसिड’ या अत्यंत घातक विषामध्ये होते, जे मानवी शरीरासाठी प्राणघातक ठरू शकते.

दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यास किंवा मिथेनॉलचे सेवन केल्यास होणारे गंभीर परिणाम:

 अंधत्व येणे :

मिथेनॉलमुळे डोळ्यांच्या ऑप्टिक नसा गंभीररीत्या प्रभावित होतात. त्यामुळे व्यक्तीची दृष्टी कायमची जाऊ शकते.

 अवयव निकामी होणे :

मिथेनॉलचा यकृत (लिव्हर), मूत्रपिंड (किडनी) आणि मेंदूवर घातक परिणाम होतो. त्यामुळे हे महत्त्वाचे अवयव निकामी होण्याचा धोका निर्माण होतो.

 कोमा आणि मृत्यू :

मिथेनॉलमुळे शरीरातील आम्लधर्मीय संतुलन बिघडते, ज्याला ‘मेटाबॉलिक ॲसिडोसिस’ असे म्हणतात. या स्थितीत व्यक्ती काही तासांत कोमात जाऊ शकते आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यूही होऊ शकतो.

विषबाधेची प्राथमिक लक्षणे:

पोटात तीव्र दुखणे
उलट्या होणे
चक्कर येणे
धूसर दिसणे
श्वास घेण्यास त्रास होणे
अत्यधिक अशक्तपणा जाणवणे

तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

 

Web Title: Pimpri chinchwad spurious liquor tragedy 2026 phugewadi dapodi methanol deaths

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Liquor Sales
  • PCMC News
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा
1

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता
2

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी
3

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी
4

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.