पुणे : पुणे शहरामध्ये (Pune) पुढील काही दिवस पाणी कपात करण्यात येणार आहे. पर्वती येथील MLR टाकी वरून अस्तित्वातील 900 मि.मी. व्यासामध्ये पाणीपुरवठा करताना मोठ्या प्रमाणात लिकेज होतो. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत (Equal Water Supply Scheme) पर्वती MLR टाकी ते जगताप हाऊस दरम्यान नव्याने टाकलेल्या 1473 मि.मी. व्यासाच्या पाण्याच्या लाईनचे काम पूर्ण झाले आहे. या लाईनच्या जोडणीची कामे सोमवार दिनांक 8/01/2024 ते 22/01/2024 दरम्यान करण्यात येणार आहेत. त्यामुळे या दरम्यान पुणेकरांना पाणी कपातीचा (Pune Water Supply) सामना करावा लागणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या (PMC) पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा केवळ एक वेळ करण्यात येणार आहे. तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पाणी कपात करण्यात येणारे भाग
प्र. क्र. 18 – स्वारगेट पोलीस लाईन , झगडेवाडी खडकमाळ आळी, घोरपडी पेठचा संपूर्ण परिसर, मोमिनपुरा पूर्ण, टिंबर मार्केट, महात्मा फुले पेठ, गंजपेठ, गुरुवार पेठ, धोबी घाट, खडक पोलीस वसाहत
प्र. क्र. 19 – लोहिया नगर, इनामके मळा, घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, काशिवाडी, गुरुनानकनगर, नेहरू रोड, पूर्ण भवानी पेठ परिसर, बालाजी व भवानी माता मंदिर परिसर, टिंबर मार्केट, नवीन नाना पेठ, हरकानगर, चुडामण तालीम
प्र. क्र. 20 – भगवान दास चाळ, वायमेकर चाळ, न्यु नाना पेठ परिसर, राजेवाडी, पत्राचाळ SRA, भवानी पेठ पोलीस वसाहत, सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, पद्मजी सोसायटी परिसर, महीफिल वाडा, साठेवाडा, रमेश फर्निचर परिसर, सायकल सोसायटी
प्र. क्र. 28 – मुकुंदनगर, व्हेईकल डेपो, अप्सरा टॉकीज परिसर,
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, C.P. W.D. Quarter, रांका हॉस्पिटल परिसर, शंकरशेठ रोड एस. टी. स्टॅन्ड ते धोबी घाट परिसर उजवी बाजू, मीरा सोसायटी
प्र. क्र. 29 – लक्ष्मी नारायण चौकीच्या मागील वस्ती, मित्र मंडळ कॉलनी