पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा विभाग यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या मुकुंद ससीकुमार याने आपली विजयी मालिका कायम ठेवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुहेरीत भारताच्या अर्जुन कढे व जीवन नेद्दुचेझियन या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
फेलिक्स गिलचा 6-1, 6-0 असा सहज पराभव
म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत एकेरीत भारताच्या मुकुंद ससीकुमार याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या ग्रेट ब्रिटनच्या फेलिक्स गिलचा 6-1, 6-0 असा सहज पराभव केला. मुकुंदने फेलिक्सचे आव्हान अवघ्या 51मिनिटात मोडीत काढले. सामन्यात पूर्णपणे वर्चस्व गाजवणाऱ्या मुकुंद याने पहिल्या सेटमध्ये दुसऱ्या गेममध्ये फेलिक्सची सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये मुकुंदने फेलिक्सला फार काही संधी दिली.
फेलिक्सला अखेरपर्यंत सुर गवसला नाही
चौथ्या गेममध्ये मुकुंदने फेलिक्सची पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-1 असा जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या फेलिक्सला अखेरपर्यंत सुर गवसला नाही. दुसऱ्या सेटमध्ये मुकुंदने फेलिक्सची चौथ्या, सहाव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-0 असा एकतर्फी जिंकून अंतिम आठ खेळाडूंमध्ये आपले स्थान निश्चित केले.
स्पर्धकांची आगेकूच
फ्रांसच्या एन्झो कौकौड याने पाचव्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या दालीबोर सेव्हरसिनाचा 6-4, 5-7, 4-1 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या मानांकित ॲडम वॉल्टनने तैपेईच्या तुंग लिंग वूचा टायब्रेकमध्ये 6-0, 6-7(5), 7-6(4) असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. चौथ्या मानांकित व्हॅलेंटिन व्हॅचेरोट याने ऑस्ट्रेलियाच्या ट्रिस्टन स्कूलकेटचे आव्हान 6-1, 6-2 असे संपुष्टात आणले.
पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलमेंट ऑथोरीटी (पीएमआरडीए) यांनी प्रायोजित ही स्पर्धा भारतातील एटीपी चॅलेंजर मालिकेतील तिसरी स्पर्धा आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धा बंगळुरू आणि चेन्नई येथे पार पडल्या आहेत.
दुहेरीत पहिल्या फेरीत भारताच्या अर्जुन कढे व जीवन नेद्दुचेझियन या अव्वल मानांकित जोडीने रित्विक चौधरी बोलीपल्ली व निकी कलियांदा पोनाचा यांचा 6-3, 6-3 असा पराभव उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
निकाल : मुख्य ड्रॉ : दुसरी फेरी :
एन्झो कौकौड (फ्रांस)वि.वि. दालीबोर सेव्हरसिना(चेक प्रजासत्ताक)(5)6-4, 5-7, 4-1;
मुकुंद ससीकुमार(भारत)वि.वि. फेलिक्स गिल (ग्रेट ब्रिटन)6-1, 6-0;
ॲडम वॉल्टन(ऑस्ट्रेलिया) [3]वि.वि. तुंग लिंग वू(तैपेई)6-0, 6-7(5), 7-6(4);
व्हॅलेंटिन व्हॅचेरोट(मॉन) [4] वि.वि. ट्रिस्टन स्कूलकेट(ऑस्ट्रेलिया)6-1, 6-2;
दुहेरी गट : पहिली फेरी :
अर्जुन कढे(भारत)/जीवन नेद्दुचेझियन(भारत)[1]वि.वि.रित्विक चौधरी बोलीपल्ली(भारत)/निकी कलियांदा पोनाचा(भारत)6-3, 6-3;
डॅन ॲडेड (फ्रांस)/युन सेओंग चुंग (कोरिया)[3] वि.वि.फ्रान्सिस कैसे अलकांतरा(फिलिपिन्स)/काची उचिडा (जपान)6-2, 6-2;
जेकॉब स्नॅटर (जर्मनी)/मार्क वॉलनर (जर्मनी)वि.वि.रे हो (तैपेई)/कॅलम पुटरगिल (अमेरिका)7-6(9), 6-4;
दुजे अजदुकोविक (क्रोएशिया)/एनरिको डल्ला व्हॅले(इटली)वि.वि. ग्रॉफरी बी/ बेंजमिन बोंझी (फ्रांस)7-5, 6-3.






