मुंबईकरांना मिळणार वाहतुकीचा नवा पर्याय; 2028 पर्यंत पॉड टॅक्सीची सेवा सुरु करण्याचा मानस, परिवहन मंत्र्यांची माहिती
मुंबईतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, याचा परिणाम वाहतुकीवर होतो आहे. दररोज लाखो लोक कामासाठी बाहेर पडतात, ज्यामुळे रस्त्यांवर वाहतूककोंडी निर्माण होते. यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत मेट्रोचे जाळे पसरवले जात आहे. मेट्रो प्रकल्पामुळे लोकांना अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. या मेट्रो मार्गांमुळे रस्त्यांवरील गाड्यांची संख्या कमी होईल आणि वाहतूककोंडीवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. पण आता याव्यतिरिक्त मुंबईत पॉड टॅक्सी सुरु करण्यास देखील सरकार सकारत्मक दिसत आहे. नुकतीच याबाबत बैठक सुद्धा घेण्यात आली आहे.
Mumbai Bike Taxis: महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईत परिवहन विभागाची बाईक टॅक्सीला परवानगी
मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाहनांच्या संख्येसोबतच प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढत्या प्रवाशी संख्येला सध्या असलेल्या परिवहन सेवेला मर्यादा येत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये कोणत्या मार्गांवर कोणती परिवहन सेवा उपलब्ध करून देता येईल, याबाबत विचार करावा. त्यासाठी जास्त वर्दळ आहे, अशा ठिकाणी सर्वेक्षण करण्यात यावे. यंत्रणांनी नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकच्या परिवहन सेवांचे पर्याय निर्माण करावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले.
परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या दालनात वाटर टॅक्सी, रोप वे, पॉड टॅक्सी यासंदर्भात बैठकीचे आयोजन परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. बैठकीला नगरविकास विभागाचे अधिकारी मेरी टाईम बोर्डाची अधिकारी,परीवहन आयुक्त एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
Govind Pansare case: कॉम्रेड गोविंद पानसरे प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
परिवहन विभागाअंतर्गत रोप वे या नवीन परिवहन सेवेच्या स्वतंत्र विषयाचा अंतर्भाव करण्याच्या सूचना देत परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, रोप वे निर्माण करण्याकरीता नवीन यंत्रणा निर्माण करावी लागेल. सध्या रोप वे निर्माण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यंत्रणा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी नवीन नियम तयार करावे. पार्किंगची मोठी समस्या मोठ्या शहरांमध्ये आहे. मुंबई महानगर प्रदेशात मुंबई महागनर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने भूमीगत पार्किंग प्लाझा तयार करण्यासाठी सर्वेक्षण करावे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
भूमीगत पार्किंग प्लाझा ठिकाणी व्यावसायिक मॉल असावे. पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी. बांद्रा पूर्व ते कुर्ला दरम्यान 8.8 किलोमीटर अंतराची ही सेवा असून यामध्ये 38 स्थानके असणार आहे. यामध्ये दर 15 सेकंदाला स्टॉप असणार आहे. त्यानुसार कामाचे नियोजन करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले. लंडनच्या हिथरो एअरपोर्टच्या पॉड टॅक्सीने प्रेरित होऊनच मुंबईतील बीकेसीतही चालवल्या जाणार आहे. हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्णत्वास आण्याचा सरकारचा मानस आहे.