Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपोडे बुद्रुक गावाला पोलीस छावणीचे स्वरुप; ‘या’ कारणावरुन भाजप-शरद पवार गटात हाणामारी

पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंंग्रेस शरदचंद्र पवार गटात झालेल्या हाणामारीमुळे गावात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 10, 2024 | 04:34 PM
पिंपोडे बुद्रुक गावाला पोलीस छावणीचे स्वरुप; ‘या’ कारणावरुन भाजप-शरद पवार गटात हाणामारी
Follow Us
Close
Follow Us:
कोरेगाव : पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंंग्रेस शरदचंद्र पवार गटात झालेल्या हाणामारीमुळे गावात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पैसे वाटपावरून स्थानिक कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. ६) काही जणांना पकडले होते. सायंकाळी साडे चारच्या सुमारास तलाठी कार्यालयासमोर हा प्रकार घडला होता.
लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मतदान करावे म्हणून काहीजण मतदारांना पैसे वाटप करत असल्याची माहिती गावातील कार्यकर्त्यांना समजली. ते संबंधित ठिकाणी जाऊन पैसे वाटप होत आहे किंवा नाही याबाबत खात्री करीत असताना दोन्ही गटांत बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे काही काळ गोंधळ होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी ही माहिती वाठार स्टेशन पोलिसांना दिली होती. मतदानाच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने राष्ट्रवादी कॉंंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशन समोर मोठी गर्दी केली होती.
एसआरपीफचे जवान तैनात
दरम्यान कोरेगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम यांनी शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी गावात भेट दिली. मंगळवारी (दि. ७) मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या पार्श्वभूमीवर गावात गेले दोन दिवस पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू आहे. दुपारी वाठार पोलिस व एसआरपीफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. बुधवारी (दि. ८) भाजपचे जिल्हाध्यक्ष  धैर्यशील कदम, आमदार जयकुमार गोरे यांनी तर गुरुवारी (दि. ९) सायंकाळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना भेटून घटनेबाबत माहिती घेतली.

Web Title: Police deployment in pimpode budruk village clash between bjp sharad pawar group nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2024 | 04:34 PM

Topics:  

  • BJP
  • Koregaon
  • Lok Sabha Election
  • maharashtra
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : हेच बघायचं बाकी होतं! भाजप-काँग्रेस युती, शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवलं? अंबरनाथमध्ये राजकीय उलथापालथ
1

Maharashtra Politics : हेच बघायचं बाकी होतं! भाजप-काँग्रेस युती, शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवलं? अंबरनाथमध्ये राजकीय उलथापालथ

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही
2

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

BMC Election 2026: पदयात्रा आणि घरोघरी प्रचारामुळे राजकारण्यांची भूक वाढली! समोसे, वडापाव आणि बिर्याणीच्या मागणीत २५% वाढ
3

BMC Election 2026: पदयात्रा आणि घरोघरी प्रचारामुळे राजकारण्यांची भूक वाढली! समोसे, वडापाव आणि बिर्याणीच्या मागणीत २५% वाढ

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
4

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.