Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात पोलीस अधिकाऱ्याने थांबवलं इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; नेमकं काय घडलं?

राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार तसेच गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या साखरपुड्यातील खर्चावरून टीकेचे धनी ठरलेले निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा चर्चेत आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 14, 2025 | 01:29 PM
पुण्यात पोलीस अधिकाऱ्याने थांबवलं इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; नेमकं काय घडलं?

पुण्यात पोलीस अधिकाऱ्याने थांबवलं इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; नेमकं काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:
  • इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने वाद
  • मध्येच सगळं बंद पाडलं
  • नेमकं काय घडलं?
पुणे : राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार तसेच गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या साखरपुड्यातील खर्चावरून टीकेचे धनी ठरलेले निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा चर्चेत आले आहेत. पुण्यातील एक कार्यक्रम वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरल्यानंतर त्यांचा लाईव्ह कार्यक्रमच पुणे पोलिसांनी बंद केला आहे. एक लेन मोकळी केल्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू झाला. पण, तो कार्यक्रम संयोजकांना उरकता घ्यावा लागला.

हा कार्यक्रम मुख्य रस्त्यावर ठेवण्यात आल्याने हडपसर तसेच काळेपडळ आणि कोंढवा भागातील नागरिकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागला. पोलिसांना वाहतूक कोंडी सुरळीत करण्यास जवळपास दोन तास लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कार्यक्रम बंद करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात सध्या निवडणूकीचे वारे वाहत आहे. अनेक इच्छुकांकडून आपआपल्या प्रभागात असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. प्रभाक क्रमांक ४१ मध्ये देखील काही इच्छुक कार्यकर्त्यांनी इंदुरीकर यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. शुक्रवारी हा कार्यक्रम काळेपडळमधील श्रीराम चौकात ठेवण्यात आला होता. येथील रस्ता ६० फुटी आहे. येथून सायंकाळी मोठी वाहतूक असते. पण, हा कार्यक्रम थेट रस्त्यावरच स्टेज टाकून ठेवण्यात आला होता. दरम्यान, या कार्यक्रमाची कोणतीही परवानगी देखील घेण्यात आली नव्हती, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही वेळातच मोठी गर्दी झाली. नागरिक रस्त्यावर खुर्च्या टाकून बसले. पाहता-पाहता प्रचंड गर्दी झाली अन् रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

साडे पाचपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल सुरू झाले. सय्यदनगर, ससाणेनगर, गाडीतळ तसेच हडपसरमधून नागरिक या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे काही वेळातच दोन ते तीन किलोमिटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. त्यात शाळा सुटण्याची वेळ असल्याने स्कूल व्हॅन देखील यात अडकून पडल्या. त्यामुळे पालक व नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. नंतर काळेपडळ वाहतूक विभागाने याठिकाणी धाव घेतली. तेव्हा कोंडी पाहून अधिकारीही हवालदिल झाले.

रस्ता रिकामा करण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही बाजूला होईना. त्यामुळे वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण जाधव यांनी थेट विनंतीपुर्वक हा कार्यक्रम बंद करण्यास सांगितले. त्यांना काही प्रमाणात विरोध झाला. पण अधिकाऱ्यांनी वाहतूक कोंडी प्रचंड झाली आहे, नागरिकांचे हाल होत आहेत, असे सांगत कार्यक्रम काही वेळ बंद केला. माईकवरूनच विनंती करत नागरिकांना एक लेन रिकामी करण्याची विनंती केली. लेन रिकामी झाल्यानंतर वाहतूक सुरूळीत करण्यास सुरूवात झाली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दोन तास लागले, तेव्हा वाहतूक सुरळीत झाली, असे जाधव यांनी सांगितले.

Web Title: Police officer stops indurikar maharajs kirtan in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 01:29 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Maharashtra Police
  • Traffic

संबंधित बातम्या

जावळीत मुबंई पोलिसांची मोठी कारवाई! ​एमडी ड्रग्जची पाळेमुळे जावळीपर्यंत पोहचली कशी?
1

जावळीत मुबंई पोलिसांची मोठी कारवाई! ​एमडी ड्रग्जची पाळेमुळे जावळीपर्यंत पोहचली कशी?

मावळ हादरलं! 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या; आरोपीला ठोकल्या बेड्या
2

मावळ हादरलं! 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या; आरोपीला ठोकल्या बेड्या

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचा खर्च; मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना भेटणार
3

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचा खर्च; मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना भेटणार

ऊस बिलातून कर्जवसुली थांबवा, अन्यथा…; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा
4

ऊस बिलातून कर्जवसुली थांबवा, अन्यथा…; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.