
कल्याण : मनसे कल्याण महिला शहराध्यक्ष शीतल विखणकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाला आहे. आत्ता या प्रकरणात मनसे नेते खडकपाडा आणि कोनगाव पोलिसांना भेटून या प्रकरणी प्रतिक्रिया देणार आहेत. प्रकरण कोन गाव हद्दीत झाले असताना या प्रकरणाला खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखविले गेले. आधी हे प्रकरण अपघात असल्याचे सांगण्यात आले. आता हा अपघात नसून आत्महत्या झाल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. हे प्रकरण अपघात आहे की, आत्महत्या आहे की हत्या आहे. याचा उलगडा झाला पाहिजे. दहा दिवसांच्या तपासात पोलिसांनी काय केले. सत्ताधारी पक्षाचा एक मोठा नेता या प्रकरणावर पर्दा टाकण्यासाठी दबाव आणत आहे अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
१५ डिसेंबर रोजी शितल विखणकर या मनसे महिला शहराध्यक्षांना वेद रुग्णालयात दाखल करण्यात आले. खडकपाडा पोलिसांकडून सांगण्यात आले होते की, शितल यांच्या घरात गॅस शेगडीचा भडका झाल्याने त्या ८० टक्के भाजल्या आहेत. त्यांनी स्वत: हा जबाब पोलिसांना दिला असल्याचे सांगितले. शीतल यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरीता ऐरोली बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार घेत असताना शीतल यांची प्राणज्योत अखेर ९ व्या दिवशी मावळली. त्यांचा मृतदेह घरी आणण्या आधीच धक्कादायक खुलासे होण्यास सुरुवात झाली आहे.
पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
शीतल विखणकर यांच्यासोबत घडलेली घटना ही कोण गाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीत घडली होती. खडकपाडा पोलिसांना जेव्हा विचारण्यात आले की, ही घटना कोनगावत घडली होती तर खडकपाडा का सांगितले गेले. पोलिसांचा जबाब होता की, कोनगाव पोलिसांनी आम्हाला सांगितले होते. पोलीस शीतल यांच्या घरी जाऊन आले होते. वेद रुग्णालयात शीतल यांना कोणी दाखल केले होते. याचा तपास जेव्हा सुरु झाला. त्यासाठी सीसीटीव्ही तपासले गेले. शीतल यांचा गाडी चालक अविनाश पाटील हा त्यांना घेऊन आला होता. तीन ते चार दिवस तो कुठे होता. त्याचे हात भाजले होते. कोनगाव पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत काय तपास केला ही विचारणा केली असता वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेंद्र पवार यांनी सांगितले की, हे आत्महत्येचे प्रकरण दिसतं आहे. कारण की मयत महिला शीतल यांनी स्वत: राकेलच्या बाटल्या कोनगावच्या घरी घेऊन आल्या होत्या. त्याचे फोटो त्यांनी अविनाश याला पाठविले होते.
या प्रकरणात आता मनसेेचे नेते अविनाश जाधव यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणी पोलिसांकडे विचारपूस करुन माध्यमांशी बोलू. मात्र या प्रकरणात आणखीन एक चर्चा जोरात सुरु आहे. अविनाश पाटील याला वाचविण्याकरीता सत्तेतील पक्षाचा एक बडा नेता पोलिसांवर दबाव आणतो आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या प्रकारे होते नाही. मनसेतही तशी चर्चा असून मनसेनेही पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.
काही प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाही.
1) अविनाश पाटील याची या प्रकरणात काय भूमिका आहे.
2) हा अपघात आहे की, आत्महत्या आहे. या बाबत पोलिसांची भूमीका अस्पष्ट आहे.
3) शीतल यांनी आत्महत्या केली आहे तर त्यांनी कोनगावचे घर का निवडले.
4) ही आत्महत्या असेल तर त्यामागील कारण काय?
5) तो मोठा राजकीय नेता अविनाश पाटील याला का वाचवित आहे.