
अजित पवारांच्या निधनाने प्रकाश आंबेडकर भावूक (Photo Credit- X)
अजित पवारांच्या निधनाने प्रकाश आंबेडकर भावूक (Photo Credit- X)
प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे. ते राज्याचे उमदे नेतृत्व होते. जे त्यांच्या मनात होते, तेच ओठात होते. कोणाला राग आला तरी चालेल, त्याची पर्वा त्यांनी केली नाही, असे व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून जाणे हे धक्कादायक आहे. सामाजिकरित्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका होती. सरकारमध्ये राहूनही सरकारच्या काही कार्यक्रमांना मी जाणार नाही, अशीही त्यांची भूमिका आपण पाहिली आहे. अजित पवार यांना वंचित बहुजन आघाडी आणि संपूर्ण आंबेडकर परिवाराच्या वतीने आदरांजली वाहतो!
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे. ते राज्याचे उमदे नेतृत्व होते. जे त्यांच्या मनात होते, तेच ओठात होते. कोणाला राग आला तरी चालेल, त्याची पर्वा त्यांनी केली नाही, असे व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून जाणे हे धक्कादायक आहे.… pic.twitter.com/UGWefEjZBv — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 28, 2026
Ajit Pawar Plane Crash: शरद पवार थेट धावपट्टीवर; अजित पवारांच्या अपघाताची घेतली सविस्तर माहिती
“संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी घोषित केली आहे. तीन दिवसांचा दुखवटा देखील जाहीर केला आहे.” हे कधीही भरून न निघाणारे नुकसान आहे. लोकनेते निघून गेल्यानंतर पोकळी निर्माण होते, ती भरून काढणे कठीण आहे. संघर्षाच्या काळात आम्ही एकत्र काम केलं आहे. या घटनेवर विश्वास ठेवण्यास मन तयार होत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, अजित पवार यांनी बारामतीला विशेष ओळख मिळवून दिली. बारामतीची ओळख केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात ‘विकासाचा मॉडेल’ म्हणून झाली आहे. या विकासाच्या केंद्रस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व होते. त्यांच्या अशा अकाली जाण्याने फक्त राजकारणातच नाही तर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
बारामती विमानतळावर उतरताना चार्टर्ड विमान कोसळले. जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी पुण्यात होणार आहेत आणि या निवडणुकांसाठी अजित पवार यांनी बारामतीमध्ये बैठका नियोजित केल्या होत्या. या बैठका होण्यापूर्वीच हा अपघात झाला.