Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात धंदा करायचा अधिकार नाही!” परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना थेट इशारा

"महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकणे बंधनकारक आहे," असा कडक इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 'महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव २०२६' मध्ये रिक्षा व टॅक्सी चालकांना दिला आहे. यासाठी चालकांना १०५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 19, 2026 | 09:19 PM
“मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात धंदा करायचा अधिकार नाही!” परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना थेट इशारा
Follow Us
Follow Us:
  • “महाराष्ट्रात कमवायचं असेल, तर मराठी आलंच पाहिजे!”
  • ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव २०२६’ मध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कडक
  • रिक्षा-टॅक्सी चालकांना अल्टिमेटम
मुंबई: “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, इथून पैसे कमवून आपल्या कुटुंबाचे पोट भरायचे असेल, तर व्यावहारिक मराठीचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. ज्यांना तेवढेही ज्ञान नसेल, त्यांना या राज्यात व्यवसाय करण्याचा कोणताही अधिकार नाही,” अशा अत्यंत कडक शब्दांत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना थेट इशारा दिला आहे. ‘मराठी भाषे’च्या सक्तीवरून सुरू असलेल्या राजकीय वादावर नवभारत मीडिया ग्रुप आयोजित ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव २०२६’ (Navabharat Maharashtra First Conclave 2026) च्या व्यासपीठावरून त्यांनी सरकारची अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली.

परिवहन मंत्र्यांनी केले स्पष्ट

या नियमाचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे सांगत परिवहन मंत्र्यांनी परिषदेत स्पष्ट केले की, “व्यावहारिक ज्ञान म्हणजे रिक्षा किंवा टॅक्सी चालकाने घरात जाऊन मराठीतच बोलले पाहिजे किंवा पुढचे उच्च शिक्षण मराठीतूनच केले पाहिजे, असा मुळीच नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, गडचिरोली, चंद्रपूर किंवा आदिवासी पाड्यांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांशी चालकांचा योग्य संवाद झाला पाहिजे. ‘किती पैसे झाले?’, ‘कुठे जाणार आहात?’, ‘इकडे गाडी चालते का?’ यांसारखे साधे प्रश्न चालकाला समजले पाहिजेत आणि त्याचे उत्तर प्रवाशाला देता आले पाहिजे. प्रवाशांना जर हिंदी येत नसेल, तर त्यांनी काय करायचे?”

🗓️ १९ मे २०२६ l 📍 मुंबई नवभारत मीडिया ग्रुपचा ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव्ह २०२६’ (Maharashtra 1st Conclave 2026) या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलो. या वर्षीच्या कॉन्क्लेव्हची मुख्य थीम “Magnetic Maharashtra – Where Growth Attracts the World” अशी होती. या मध्ये… pic.twitter.com/jGS1uPWmEa — Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) May 19, 2026

३ महिन्यांऐवजी दिली १०५ दिवसांची मुदत!

“आम्ही चालकांवर अचानक कोणताही नियम लादलेला नाही. हा वाहतूक विभागाचा अतिशय जुना नियम असून परवाना किंवा बॅज (Badge) देतानाच या अटी नमूद केलेल्या असतात,” असे प्रताप सरनाईक म्हणाले. चालकांनी मागणी केलेल्या वेळेपेक्षा जास्त कालावधी दिल्याचे सांगत त्यांनी रोडमॅप स्पष्ट केला. चालकांनी तीन महिन्यांची वेळ मागितली होती, परंतु सरकारने त्यांना तब्बल १०५ दिवसांची (साडेतीन महिने) मुदत दिली आहे. यासाठी चालकांना विशेष मार्गदर्शन पुस्तिका देण्यात आली आहे.  मराठी शिकवण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार असून, चालकांना स्वतःच्या खिशातून एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.

ST Bus Fare Hike : एसटी बसचा प्रवास महागणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टच सांगितलं…

मराठीच्या नावावर राजकारण थांबवा

काही राजकीय नेत्यांवर थेट निशाना साधताना परिवहन मंत्री म्हणाले, “मुंबई आणि ठाण्यातील काही नेते केवळ उत्तर प्रदेशातील बांधवांनाच लक्ष्य केले जात असल्याचे भासवून राजकारण करत आहेत. प्रत्यक्षात गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि अगदी जम्मू-काश्मीरमधून आलेले चालकही मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालवतात. हे परप्रांतीय चालक स्वतःहून मराठी शिकायला तयार आहेत, मग नेत्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी राजकारण का करावे?” अनेक चालकांनी स्वतःहून आपल्याला मराठी शिकण्याची इच्छा असल्याचे कबूल केल्याचेही त्यांनी नमूद केले.

हिंदी भाषिक पत्रकारांचे दिले उदाहरण

“महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेचा अभिमान असायला हवा, मराठीची लाज वाटण्याचे कारण नाही. आपल्याकडे अनेक हिंदी भाषिक पत्रकार आहेत, जे आमच्यापेक्षाही अत्यंत सुंदर आणि अस्खलित मराठी बोलतात. जर ते शिकू शकतात, तर व्यवसाय करणारे चालक का नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. साडेतीन महिन्यांच्या मुदतीनंतर नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर परिवहन विभाग कायदेशीर कारवाई करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

Pratap Sarnaik: खासगी बसच्या मनमानी भाडेवाढीवर सरकारचा लगाम; प्रताप सरनाईकांकडून विशेष समिती गठित

Web Title: Pratap sarnaik at maharashtra first conclave 2026 marathi mandatory for rickshaw taxi drivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • Auto Driver
  • maharashtra
  • Maharashtra First Conclave 2026
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
1

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

World Vada Pav Day: वडापावप्रेमींनो पाहिलंत का? ४ किलोचा वडापाव अन् २.५ किलोचा समोसा! मीरा-भाईंदरमध्ये खवय्यांची गर्दी
2

World Vada Pav Day: वडापावप्रेमींनो पाहिलंत का? ४ किलोचा वडापाव अन् २.५ किलोचा समोसा! मीरा-भाईंदरमध्ये खवय्यांची गर्दी

Advocates Protection Act: वकिलांवर हल्ले सुरूच; संरक्षण कायदा कधी? निकम बंधूंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
3

Advocates Protection Act: वकिलांवर हल्ले सुरूच; संरक्षण कायदा कधी? निकम बंधूंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

Amravati Hospital Fire: अमरावतीतील डफरीन रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बालकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत
4

Amravati Hospital Fire: अमरावतीतील डफरीन रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बालकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.