Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar Case : ‘दोषींना कोणतीही माफी नाही…’, मीरा-भाईंदर अत्याचार प्रकरणावर प्रताप सरनाईक यांची कठोर भूमिका

मीरा-भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत, “राजकीय पार्श्वभूमी किंवा नातेसंबंध पाहून कोणालाही संरक्षण मिळणार नाही....

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 11, 2026 | 11:47 AM
'दोषींना कोणतीही माफी नाही...', मीरा-भाईंदर अत्याचार प्रकरणावर प्रताप सरनाईक यांची कठोर भूमिका

'दोषींना कोणतीही माफी नाही...', मीरा-भाईंदर अत्याचार प्रकरणावर प्रताप सरनाईक यांची कठोर भूमिका

Follow Us
Follow Us:
  • मीरा-भाईंदर अत्याचार प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने संताप; सरनाईक म्हणाले- “राजकीय पाठबळ चालणार नाही”
  •  पॉक्सो प्रकरणावर परिवहन मंत्री सरनाईक यांची कठोर भूमिका
विजय काते, भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणावर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका नगरसेविकेच्या भावावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून त्याच्याविरोधात पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही शहरातील एका नगरसेवकाविरोधात अशाच स्वरूपाचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना सरनाईक म्हणाले की, “अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहेत. अशा प्रकरणांमध्ये कोणत्याही आरोपीला त्याची राजकीय पार्श्वभूमी, नातेसंबंध किंवा पद पाहून संरक्षण दिले जाता कामा नये. कायदा सर्वांसाठी समान आहे आणि दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.” त्यांनी पुढे सांगितले की, “मीरा-भाईंदर शहरात काही काळापासून लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे समोर येत आहेत. अशा घटनांकडे केवळ राजकीय विषय म्हणून पाहण्याऐवजी सामाजिक आणि कायदेशीर दृष्टिकोनातून गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. अशा गुन्ह्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो आणि सर्वसामान्य नागरिकांचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास कमी होतो.”

Mira Bhayandar: गोल्डन चौकी परिसरात अनधिकृत मशिद आणि मंदिरावर कारवाई; परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

सरनाईक यांनी भाजप नेतृत्वालाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत म्हटले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ आणि जबाबदार प्रशासनाचा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाशी संबंधित व्यक्तींवर अशा स्वरूपाचे आरोप होत असतील, तर पक्षानेही त्याची गंभीर दखल घेणे अपेक्षित आहे. अशा प्रकरणांमध्ये कोणतीही तडजोड किंवा राजकीय हस्तक्षेप होऊ नये.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याचे सांगत सरनाईक म्हणाले, “मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी या प्रकरणाबाबत चर्चा करणार आहे. तसेच लेखी पत्रव्यवहार करून या घटनेची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणार आहे. पीडित मुलीला न्याय मिळणे ही सरकार आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.”

पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन देत त्यांनी सांगितले की, “या प्रकरणाचा शेवट न्याय मिळेपर्यंत व्हायला नको. पीडित मुलीच्या शिक्षण, पुनर्वसन आणि भविष्यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठीही मी प्रयत्नशील राहीन. कोणत्याही दबावाखाली किंवा प्रभावाखाली तपास होऊ नये, यासाठी प्रशासनाने पारदर्शक भूमिका घ्यावी.”

दरम्यान, या प्रकरणामुळे मीरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध सामाजिक संघटना, महिला संघटना आणि नागरिकांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी होत आहे. आरोपींना कठोर शिक्षा देऊन पीडितेला न्याय मिळावा, अशी भावना शहरभरातून व्यक्त केली जात आहे. पोलीस तपास सुरू असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mira Bhayandar crime: भाईंदरमध्ये खळबळ! गुरुद्वारासमोरील झुडपांत सापडला अर्धनग्न जळालेला मृतदेह; पोलीस तपास सुरु

Web Title: Pratap sarnaik reaction mira bhayandar minor girl abuse pocso case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • crime
  • mira bhayandar
  • police
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Aaditya Thackeray : ‘दुसऱ्यावर धर्म लादणं ही हिंसाच!’ मिरा-भाईंदरच्या शाळेत कांदा-लसूण बंदी; आदित्य ठाकरे संतापले
1

Aaditya Thackeray : ‘दुसऱ्यावर धर्म लादणं ही हिंसाच!’ मिरा-भाईंदरच्या शाळेत कांदा-लसूण बंदी; आदित्य ठाकरे संतापले

Mira Bhayandar News: पर्युषणात कांदा-लसूण खाऊ नका! शाळेच्या व्हॉट्सॲप मेसेजवरून वाद; मनसे आक्रमक
2

Mira Bhayandar News: पर्युषणात कांदा-लसूण खाऊ नका! शाळेच्या व्हॉट्सॲप मेसेजवरून वाद; मनसे आक्रमक

Washim News: ‘कोम्बिंग’मध्ये ७ फरार आरोपी जेरबंद; वाशिम पोलिसांनी जिल्ह्यामध्ये राबविली शोधमोहीम
3

Washim News: ‘कोम्बिंग’मध्ये ७ फरार आरोपी जेरबंद; वाशिम पोलिसांनी जिल्ह्यामध्ये राबविली शोधमोहीम

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
4

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.