Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; चिपळूणमधील काँग्रेसचं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग गंभीर संकटात सापडला आहे. शासनाने ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 05, 2025 | 07:27 PM
Ratnagiri News : पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; चिपळूणमधील काँग्रेसचं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
Follow Us
Close
Follow Us:

चिपळूण : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग गंभीर संकटात सापडला आहे. शासनाने ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. दर हेक्टर ५० हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी चिपळूण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत करण्यात आली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांची भेट घेत मागण्याचे निवेदन दिले व चर्चा केली.

यावेळी पदाधिकारी म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने अद्याप कोणताही दिलासा दिलेला नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही राज्यांत पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर पंतप्रधानांनी तातडीने दौरे केले. मात्र महाराष्ट्रात आजपर्यंत दौरा केला नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, त्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि ओला दुष्काळ घोषित करून दिलासा द्यावा. अनेक शेतकऱ्यांची शेतीची साधने वाहून गेली आहेत. जमिनीची धूप देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे. घरांसह शेती पिकांचे नुकसान झाल्याने त्यांना उभारी देण्यासाठी शासनानेच पुढाकार घ्यायला हवा, अन्यथा या पुरग्रस्त शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. सत्ताधारी मंत्री केवळ पाहणी करण्यात गुंतले आहेत. अद्याप राज्य सरकारने पुरग्रस्तांना मदतीचा हात दिलेला नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी कर्जमाफी योजना राबवावी, अशी मागणीही करण्यात आली.

Amit Shah on Farmer: अमित शहांचे राज्य सरकारला ठोस आश्वासन; पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत निधी मिळणार; पण ठेवली ‘ही’ अट

यावेळी कॉंग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग, तालुकाध्यक्ष लियाकत शाह, शहराध्यक्ष संतोष सावंत देसाई, संजय जाधव, सुबोध सावंत देसाई, कबीर काद्री, यशवंत फके, कांता चिपळूणकर, डॉ. सरफराज गोठे, अजित शिंदे, लियाकत शेख, राजेंद्र भुरण, इंतिखाब चौगुले, दादा आखाडे, महादेव चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष निर्मलाताई जाधव, शहराध्यक्ष विणा जावकर, सफा गोठे, नंदा भालेकर, युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह, अ. ल माळी डॉ. दिपक विखारे, अनिल रेपाळ, सुनिल खेडेकर, विनायक जाधव, सुरेश राऊत, कैसर देसाई आदी उपस्थित होते .

Darjeeling Landslide: दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार, १७ जणांचा मृत्यू; पीएम मोदी आणि राष्ट्रपतींकडून दुःख व्यक्त

Web Title: Provide immediate assistance to flood affected farmers congress in chiplun submits a memorandum to the provincial authorities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 07:27 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Chiplun
  • Heavy Rain
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: ऐन थंडीत येणार भीषण संकट; IMD च्या इशाऱ्याने चिंता वाढली, राज्यात काय स्थिती?
1

Maharashtra Rain Alert: ऐन थंडीत येणार भीषण संकट; IMD च्या इशाऱ्याने चिंता वाढली, राज्यात काय स्थिती?

Ahilyanagar News: अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी 146 कोटी रुपये मंजूर! जीवनज्योत फाऊंडेशनच्या पाठपुराव्याला यश
2

Ahilyanagar News: अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी 146 कोटी रुपये मंजूर! जीवनज्योत फाऊंडेशनच्या पाठपुराव्याला यश

Local Body Election: रत्नागिरी जिल्ह्यात युतीत ‘पॅचअप’, चिपळूणमध्ये ‘मविआ’ फुटली
3

Local Body Election: रत्नागिरी जिल्ह्यात युतीत ‘पॅचअप’, चिपळूणमध्ये ‘मविआ’ फुटली

Sindhudurg News: खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसांना सहा लाखांची मदत द्यावी; न्यायालयाने नक्की काय सांगितलं?
4

Sindhudurg News: खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसांना सहा लाखांची मदत द्यावी; न्यायालयाने नक्की काय सांगितलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.