Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ मोहीम संपन्न! पर्यटन स्थळवरील पर्यटक मुलांसाठी चार केंद्रावर डोस

वाईतील पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम उत्साहात राबविण्यात आली. पाच वर्षांखालील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओचे दोन थेंब पोहोचवण्यासाठी ग्रामीण भागासह पर्यटनस्थळी विशेष बूथ उभारण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 28, 2026 | 09:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

वाई : ‘पोलिओमुक्त भारत’ हे राष्ट्रीय उद्दिष्ट अधिक बळकट करण्यासाठी आणि पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम आज अत्यंत उत्साहात राबविण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधी, आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या सक्रिय सहभागामुळे या मोहिमेला दुर्गम भागापासून ते मुख्य शहरापर्यंत उदंड प्रतिसाद मिळाला.

या मोहिमेचा अधिकृत प्रारंभ पाचगणी नगरीचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती शकुंतला चोरमले, सदस्या वंदनाताई भिलारे आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. महाबळेश्वर तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रद्युम्न बुलाख यांच्या चोख मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.

Satara News : वाई मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप, नगरपालिकेची बंदिस्त गटारे योजना सपशेल फेल

पाचगणी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या एरंडेल, भेकवली, टेकवली यांसारख्या दुर्गम व डोंगराळ भागातील गावांसह एकूण ३८ गावे, वाड्या आणि वस्त्यांवर विशेष लसीकरण केंद्र उभारण्यात आली होती. या मोहिमेत गावातील पालकांनी सकाळपासूनच आपल्या चिमुरड्यांना घेऊन केंद्रांवर गर्दी केली होती. आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी आधीपासूनच गृहभेटी देऊन व्यापक जनजागृती केल्यामुळे एकही बालक या मोहिमेपासून वंचित राहिले नाही.

पर्यटकांच्या मुलांसाठी विशेष दक्षता: प्रमुख पर्यटन स्थळांवर ‘मोबाईल बूथ’

पाचगणी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पर्यटनासाठी आलेल्या कोणत्याही कुटुंबातील लहान मूल पोलिओच्या डोसपासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घेतली. शहरात येणाऱ्या पर्यटकांची पावले जेथे पडतात, अशा टेबल लँड, एस.टी. स्टँड, पारसी पॉईंट आणि दांडेघर नाका या प्रमुख चार ठिकाणी विशेष बूथ कार्यान्वित करण्यात आले होते. त्यामुळे पर्यटनाचा आनंद घेतानाच शेकडो लहान मुलांना जागेवरच पोलिओचे डोस देणे शक्य झाले. ग्रामीण भागातील ३८ आणि पर्यटन स्थळांवरील ४ अशी एकूण ४२ बूथ या मोहिमेसाठी सज्ज ठेवण्यात आली होती.

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी

याप्रसंगी पाचगणी आरोग्य केंद्रात डॉ. मैथिली बेलोशे, डॉ. विशाल टकले, आरोग्य सहाय्यक एस. बी. रांजणे, तमन्ना काझी, डी. एच. यादव, जी. व्ही. रांजणे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले. बालकांचे आरोग्य हीच देशाची खरी संपत्ती असून, प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस मिळणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत नेहमीच जागरूक राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

नागरिक, पर्यटक आणि आरोग्य यंत्रणेच्या अभूतपूर्व समन्वयामुळे ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. बालकांच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी नागरिकांनी आगामी काळातही अशा सर्वच आरोग्यविषयक उपक्रमांना आपला सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Pulse polio campaign concluded at panchgani primary health centre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • Satara
  • Wai

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

बावधनमध्ये ‘मंगलमूर्ती सोशल क्लब’चा उपक्रम! ‘नाना-नानी पार्क’ची मुहूर्तमेढ; समाजऋण फेडण्यासाठी वृक्षारोपण
2

बावधनमध्ये ‘मंगलमूर्ती सोशल क्लब’चा उपक्रम! ‘नाना-नानी पार्क’ची मुहूर्तमेढ; समाजऋण फेडण्यासाठी वृक्षारोपण

BJP Seva Abhiyan Satara District: सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार!; साताऱ्यात भाजपाचे ‘सेवा अभियान’ यशस्वी
3

BJP Seva Abhiyan Satara District: सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार!; साताऱ्यात भाजपाचे ‘सेवा अभियान’ यशस्वी

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज
4

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.